राज्यातील गायरान अतिक्रमणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; दिला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

Mumbai High Court : या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील केसूर्डी गावच्या 200 शेतकरी कुटुंबि्यांचं न्यायालयाला पत्र
Mumbai Highcourt
Mumbai HighcourtSarkarnama

Mumbai High Court : राज्यातील गायरान अतिक्रमणांची संख्या 4 लाख 73 हजार 247 असून ही सर्व अतिक्रमणे ग्रामीण भागातील आहेत. ही अतिक्रमणे काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, या निर्णयाचा राज्यातील जवळपास 2 लाख 22 हजार 382 नागरिकांना फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता अतिक्रमणासंदर्भात महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला आहे. न्यायालयाने अतिक्रमणासंदर्भातील आदेशाला स्थगिती दिली आहे.

गायरान जमिनीवर अतिक्रमण काढण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. या आदेशानंतर अतिक्रमण काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, नोटीस मिळल्यानंतर अनेक लोक बेघर होतील, त्यामुळे सरकारने यावर निर्णय घेण्याची विनंती राज्यभरातून करण्यात आली होती. या प्रकरणात आता आणखी एक दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारतर्फे बजावण्यात आलेल्या नोटिसींवर मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली स्थगिती 24 जानेवारीपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.

Mumbai Highcourt
Devendra Fadanvis : मला काय मिळणार...; फडणवीसांचे पदाधिकारी, आमदारांना मोलाचे सल्ले

राज्य सरकारकडून गायरान जमिनीवरील बांधकामाविषयीच्या पाठविण्यात आलेल्या नोटिशीविरोधात शेतकर्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील केसूर्डी गावच्या 200 शेतकरी कुटुंबि्यांनी न्यायालयाला पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्राची गंभीर दखल घेत न्यायालयानं या संदर्भात सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस जी चपळगावकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. यावर आता उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

Mumbai Highcourt
Maharashtra Winter Session : शिंदे - फडणवीस सरकारचा नवा विक्रम; तब्बल ५२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

राज्य सरकारच्या 6 डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण न काढण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारकडून बजावण्यात आलेल्या नोटिसींवर मुंबई उच्च न्यायालयाने गायरान अतिक्रमण काढण्यासंदर्भातील आदेशाला 24 जानेवारी 2023 पर्यंत स्थगिती दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com