Congress Sarkarnama
पुणे

Maharashtra Congress : काँग्रेसच्या 'या' नेत्यांची तोफ धडाडणार; स्टार प्रचारकांची यादी जाहीर

By Poll Election : तीन माजी मुख्यमंत्र्यासह तरूण आमदारांचाही समावेश

सरकारनामा ब्युरो

Congress News : कसबा पेठ व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका होत असून २६ फेब्रुवारीला या दोन मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदार संघातील निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. तर यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारकांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत.

या स्टार प्रचारकांमध्ये, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Paltole), काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde), माजी मंत्री आमदार. डॉ. नितीन राऊत, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुनील केदार (Sunil Kedar), आमदार यशोमती ठाकूर, आमदार अमित देशमुख, आमदार सतेज पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार कुमार केतकर, खासदार इम्रान प्रतापगडी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा समावेश आहे. काँग्रेसचे हे स्टार प्रचारक दोन्ही मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करतील.

दरम्यान महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्याही स्टार प्रचारकांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. राष्ट्रवादीने एकूण २१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री सुनील तटकरे, माजी मंत्री फौजिया खान, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार वंदना चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रमुख विद्या चव्हाण, आमदार अमोल मिटकरी, प्रदेशाध्यक्षा जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), खासदार सुप्रिया सुळे, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe), आमदार सुनील शेळके, आमदार निलेश लंके (Nilesh Lanke), पक्षाचे पदाधिकारी शेख सुभान अली हे स्टार प्रचारक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT