Chinchwad by-election : राहुल कलाटेंची 'शिट्टी' वाजणार की ते ती आघाडीची वाजविणार?

Rahul Kalate News : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले
Rahul Kalate
Rahul Kalate Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत होती. त्या कालावधीत पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर रिंगणात राहिलेल्या २८ उमेदवारांना लगेचच चिन्ह वाटप करण्यात आले.

चिंचवडच्या लढतीतील शिवसेना बंडखोर आणि प्रमुख अपक्ष राहुल कलाटे यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे त्यांची शिट्टी वाजणार का म्हणजे ते निवडून येणार का, की आघाडीच्या उमेदवाराची (राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे) ती ते वाजविणार अशी चर्चा चिन्ह वाटपानंतर ऐकायला मिळाली.

Rahul Kalate
Politics News : भाजपमध्ये नाही काँग्रेसमध्येही नाही मग पुढे काय? सत्यजीत तांबेंनी सांगितलं...

गत विधानसभेला २०१९ ला कलाटेंनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे बॅट हे चिन्ह होते. पण, तिचा फटका बसला नाही. चौकार वा सिक्सर गेला नाही अन् त्यांचा पराभव झाला. यावेळीही तसे झाले, तर त्यांची विधानसभेच्या पराजयाची हॅटट्रिक होईल. गतवेळी दुहेरी लढत होती. यावेळी, मात्र कलाटेंमुळे ती तिरंगी म्हणजे युती, आघा़डी आणि अपक्ष म्हणून ते अशी होणार आहे. यावेळी बॅट हे चिन्ह अपक्ष किशोर काशीकर यांना मिळाले आहे.

Rahul Kalate
Amit Shah Pune visit: पुणे दौऱ्यात अमित शाह शिवनेरी किल्ल्याला भेट देण्याची शक्यता

'चिंचवड'चे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या कक्षात चिन्ह वाटप करण्यात आले. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्या पक्षांसाठी राखीव असलेली चिन्हे देण्यात आली. तर नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने सूचीबद्ध केलेल्या १९७ मुक्त चिन्हांमधून उमेदवारांनी दिलेला पसंतीक्रम विचारात घेऊन चिन्हवाटप करण्यात आले.

Rahul Kalate
Sharad Pawar News; शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये!

त्याची सोडत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी अजित पाटील, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, माध्यम कक्ष समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अपक्षांपैकी कुणाला बॅटरी, कुणाला रिक्षा, कुणाला खाट, बॅट, कपाट, टेबल, गॅस सिंलिंडर, फुटबॉल, अंगठी, कॅमेरा, हेलिकॉप्टर, सफरचंद, जहाज, शिवणयंत्र, तर कुणाला शिवणयंत्र अशी चिन्हं देण्यात आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com