Corona Sarkarnama
पुणे

झांबियातून पुण्यात आलेला एक रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह;..पण भीतीचे कारण नाही

कोरोनाची लागण झाली असली तरी ‘ओमायक्रॉन’ची लागण आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी ‘जिनोम सिक्वेन्सिग’ करावे लागणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : आफ्रिकेतील झांबिया देशातून आलेल्या पुण्यातल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून या रूग्णाला ‘ओमायक्रॉन’ची लागण झाली आहे की नाही हे बुधवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.दरम्यान पुणेकरांनी घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही.मात्र, सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

या रूग्णाची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली आहे.कोरोनाची लागण झाली असली तरी ‘ओमायक्रॉन’ची लागण आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी ‘जिनोम सिक्वेन्सिग’ करावे लागणार आहे.पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत () ही तपासणी करण्यात येणार असून बुधवारी सायंकाळपर्यंत या तपासाचा अहवाल अपेक्षित असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती २५ नोव्हेंबरला झांबियातून पुण्यात आली आहे. लक्षणे दिसू लागल्याने कोरानोची चाचणी करण्यात आली.या व्यक्तीच्या कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान ‘ओमायक्रॉन’चा एकही रूग्ण अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये. मात्र, काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

‘ओमायक्रॉन’चा वेगाने होणारा प्रसार लक्षात घेऊन केंद्र, राज्य तसेच महापालिकेची सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. उद्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे. केंद्र सरकारने केलेल्या सूचनांनुसार राज्य सरकारने अनेक नर्व निर्बंध जाहीर केले आहेत. महापालिकेची यंत्रणादेखील कामाला लागली असून या काळात नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT