corona virus, pune airport  Sarkarnama
पुणे

Corona virus BF.7 Variant : पुणे विमानतळावर आजपासून थर्मल स्क्रिनिंग सुरू होणार

Coronavirus BF.7 Variant : पुण्यात चिंतेचे कारण नाही. पण...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोनाने पुन्हा एकदा जगभरात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये तर कोरोनाच्या पहिल्या लाटेसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना(Corona) ने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने देखील कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच धर्तीवर पुणे विमानतळावर आजपासून (दि.22) थर्मल स्क्रिनिंगला सुरुवात केली जाणार आहे. (Corona virus New Variant)

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी कोरोना परिस्थितीवर महत्वपूर्ण भाष्य केले. बिनवडे म्हणाले, कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी पुणे महानगरपालिका सुसज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरु जाऊ नये. तसेच औषधांचा साठाही पुरेसा आहे. सावर्जनिक ठिकाणी मास्क वापरला तर सगळ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी फायद्याचे राहील.पुणे विमानतळावर देखील एक पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच आयसोलेशनची गरज पडली तर ती पण करण्यात येईल.

पुण्यात चिंतेचे कारण नाही. पण खबरदारी घ्यावी. सर्दी, खोकला, ताप असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे. लसीकरणमध्ये पुणे शहर अग्रेसर आहेत. शहरात ९९ टक्के लसीकरण झाले आहे. बूस्टर डोसबद्दल देखील आपल्याकडे भरपूर साठा आहे. भवानी पेठ असो किंवा हॉटस्पॉट असतील ते आयडेंटीटीफाय करतो आहे. तिथे देखील आरोग्य विभाग काळजी घेणार आहे अशी माहिती बिनवडे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT