Maharashtra Corona News: माजी आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केली 'ही' भीती

Maharashtra Assembly Live : पंतप्रधान मोदी दुपारी कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.
Rajesh Tope
Rajesh TopeSarkarnama

Maharashtra Assembly Live : कोरोनाचा धोका जगभरात वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील प्रशासन देखील सतर्क झाले आहे. पुन्हा कोरोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(Rajesh Tope latest news)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेतली."कोरोना अजून संपलेला नाही," असे मांडविया म्हणाले. आज (गुरूवारी) पंतप्रधान मोदी दुपारी कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.

राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत विधीमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले, "परदेशात कोरोना वाढत आहे. पुढच्याला ठेच मागचा सावध, या म्हणीप्रमाणे राज्य सरकारे कोरोनाला रोखण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजे. कोरोनाबाबत नियम, मार्गदर्शक तत्वे यांचे योग्य पालन व्हायला पाहिजे. पुरेशा औषधसाठा ठेवला पाहिजे. आघाडी सरकारच्या काळात टास्कफोर्स केला होता, तसाच टास्कफोर्स तयार करुन यात पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन उपाययोजना करायला हवी,"

"कोरोनाचा कोणता व्हेरियंट आहे, त्यानुसार उपाययोजना करणे गरजेचे आहे. आरोग्य विभागातील रिक्त जागा तातडीने भराव्यात. काही ठिकाणी व्हेटिलेटर कमी आहे, त्याठिकाणी त्याची लवकरच व्यवस्था करावी," असे टोपे यांनी सांगितले.

टोपे म्हणाले, "चीन, जपान, साऊथ आफ्रिकासह इतर काही देशांत करोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रातही चिंता वाढली आहे. हा आजार वाढू नये म्हणून संशयितांची ट्रेकिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज आहे. सध्या औषधांची रुग्णालयात कमी असून तातडीने आरोग्य यंत्रणा सक्षम करा,"

Rajesh Tope
Winter Session : शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

काल अधिवेशनात कोरोनाबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण केलं. "राज्यात टास्क फोर्स (task force)स्थापन करण्याची घोषणा काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केली. तर राज्यात ‘टेस्ट- ट्रॅक- ट्रीट- व्हॅक्सिनेशन’वर भर दिला जाईल," असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी काल नागपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

तानाजी सावंत म्हणाले, "कोरोनाचे निर्बंध अद्याप कोठेही लावण्यात येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील आवश्यक ते निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला आहे. आरोग्य यंत्रणेस अलर्ट मोडवर राहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात मोठ्याप्रमाणावर लसीकरण झाले आहे. नविन व्हेरिएंट हा तेवढा घातक नाही,"

Rajesh Tope
Rashmi Shukla फोन टॅप प्रकरणावरुन अजितदादा, नाना पटोले आक्रमक

कोरोनाच्या नविन व्हेरिएंटचा राज्यात अद्यापही एकही रूग्ण सापडलेला नाही. प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्हणून विमानतळावर तपासणी आणि तपासणीत काही आढळून आल्यास तात्काळ विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com