Pune Police News:  Sarkarnama
पुणे

Pune News: शिक्षणाच्या माहेर घरात शाळा सुरु करण्यासाठी सव्वा कोटींना फसवलं; प्राचार्यांवर गुन्हा

Pune Police News: शाळेच्या बँक खात्यावर शैक्षणिक शुल्कापोटी जमा होणारा निधी तिवारी यांनी वापरला.

सरकारनामा ब्यूरों

Pune: शिक्षणाचे बाजारीकरण सुरु असल्याची टिका होत असते. त्याचा प्रत्यय शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात नुकताच आला. शाळा सुरु करण्याच्या आमिषाने एक कोटी १७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. प्राचार्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्य शेफाली तिवारी, तन्मय शर्मा, रोहित भार्गव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पूर्णिमा मिलिंद कोठारी (वय ६३, रा. उत्तम टॉवर, नगर रस्ता, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सी.पी. गोयंका इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्य शेफाली तिवारी आणि पूर्णिमा तिवारी यांची ओळख होती.

२०१९ मध्ये तिवारी यांनी त्यांना आयुष्यमती ट्र्स्टकडून कॅनरी इंटरनॅनशल हायस्कूल सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरात कॅनरी इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्यात आली. कोठारी आणि त्यांचा मुलगा शाळेत ७० टक्के भागीदार होते. तिवारी यांनी त्यांना कोणतेही अधिकार दिले नाही. शाळेच्या बँक खात्यावर शैक्षणिक शुल्कापोटी जमा होणारा निधी तिवारी यांनी वापरला.

शाळेला परवानगी नसल्याने काही महिन्यानंतर शाळा बंद पडली, असे तिवारी यांनी विद्यार्थी आणि पालकांना सांगितले. शाळा बंद पडण्यामागे कोठारी कारणीभूत असल्याचे सांगून त्यांची बदनामी झाली. शाळेत भागीदार म्हणून कोठारी यांना रक्कम गुंतविण्यास सांगण्यात आले. एक ते दोन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष कोठारी यांना दाखविले. त्यानंतर तिवारी यांनी कोठारी यांच्याकडून एक कोटी १७ लाख ६७ हजार ५७९ रुपये घेतले होते.

आयुष्यमती ट्रस्टच्या संचालक असल्याची बतावणी तिवारी यांनी कोठारी यांच्याकडे केली होती. फसवणूक केल्याप्रकरणी कोठारी यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला. न्यायालयाने तिवारी यांच्यासह तिघांविरुद्ध कलम १५६ (३) विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT