Sharad Pawar: कांदा उत्पादकांसाठी शरद पवार रस्त्यावर; चांदवडला आज राष्ट्रवादीचा रास्ता रोको

Sharad Pawar Rasta Roko Andolan: पवारांच्या उपस्थितीत चांदवडमध्ये रास्ता रोको आणि सभा होणार आहे.
Sharad Pawar Rasta Roko Andolan
Sharad Pawar Rasta Roko AndolanSarkarnama
Published on
Updated on

Nashik: कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्यात बंदी (Onion Export Ban) करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये त्याला तीव्र विरोध होत आहे.

आज (सोमवार) सकाळी चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे. पवारांच्या उपस्थितीत चांदवडमध्ये रास्ता रोको आणि सभा होणार आहे. शरद पवार अनेक दिवसानंतर केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात महाविकस आघाडीचे घटक पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे), काँगेस देखील सहभागी होणार आहेत. नाशिकहून चांदवडला जाताना रस्त्यात पवार यांचे शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी स्वागत होणार आहे.

Sharad Pawar Rasta Roko Andolan
Omprakash Rajenimbalkar: इच्छुकांची गर्दी, ओमराजे मात्र 'रिलॅक्स'

आज दिल्लीत कांदा प्रश्नावर बैठक होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्राने कांदा निर्यात बंदी केल्याने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद होते. काल (रविवारी) कांदा उत्पादकांनी मंत्री भारती पवार यांच्या नाशिकमधील घराबाहेर ठिय्या आंदोलन केले. मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची आमदार दिलीप बनकर यांनी शुक्रवारी माहिती दिली होती.

या बैठकीत कांदा प्रश्नावर काय तोडगा निघतो, याकडे सगळ्याचे लक्ष आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद आहेत. अशातच शुक्रवारी (6 डिसेंबर) नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाल्यानंतर लिलाव बंद करण्याची हाक कांदा व्यापाऱ्यांनी दिली होती, त्याला बाजार समितीत प्रतिसाद मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com