Pune police
Pune police sarkarnama
पुणे

Crime News : गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या गाडीवरच दगडफेक; पुण्यातील धक्कादायक प्रकार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या गाडीवरच दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना वारजे माळवाडी परिसरात बुधवारी (दि.14) घडली आहे. याप्रकऱणी वारजे पोलीस (Warje police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिग्विजय काकाराम वाघमारे, व्यंकटेश पिळवणकर, अमोल निलेश पवार, लाल्या खान, आप्पा लोंढे, खंड्या वाघमारे यांच्यासह इतर जणांवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके हे त्यांच्या कर्मचारीसोबत त्या भागात गस्त घालत होते. यावेळी त्यांना गणपती माथा येथील रॉयल पानशॉप रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. टपरी बंद करा आणि घरी जा असं पोलिसांनी सांगितल्यानंतर गर्दीत असलेल्या आरोपींनी जमाव करून पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली आणि पळून गेले. या घटनेत सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. वारजे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT