Smriti Irani sarkarnama
पुणे

मंत्र्यांविरोधात निदर्शने भोवली : रुपाली पाटलांसह राष्ट्रवादीच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा

भाजप (BJP) नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल (ता.16) जोरदार राडा झाला होता.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भाजप (BJP) नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल (ता.16) जोरदार राडा झाला होता. या वेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादीच्या ४० ते ५० जणांवर पुण्यातील चतृश्रुंगी पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, स्मती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदीरात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच्या आधारे डेक्कन पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी तिघांवर कलम 323 (मारहाण करणे), 354 (विनयभंग), 504, 506 आणि 34 नुसार कारवाई केली आहे. त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने डेक्कन पोलिस स्टेशनला भेट देऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे महेश हांडे, निलेश निकम, उदय महाले आणि रुपाली पाटील यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस ने स्मृती इराणी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, वैशाली नागवडेंसह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या काही पुरूष नेत्यांकडून मारहाण झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होती की, चूक कोणाची आहे हे पाहण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. भाजपची चूक असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणे ही आक्षेपार्ह गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT