पुणे : भाजप (BJP) नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल (ता.16) जोरदार राडा झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP) पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडीओच्या आधारे डेक्कन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या विरोधात भाजपच्या शिष्टमंडळाने डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.
यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) उपस्थित होते. ते म्हणाले, स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते हे घुसले होते. त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट होता का यांच्या विरोधात पोलिसांनी कोणतीच कृती केली नाही, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही स्मृती इराणी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यावर पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी मुळीक यांनी केली आहे.
बालगंधर्व इथे असलेल्या कार्यक्रमात पण राष्ट्रवादी काँग्रेस कडून भाजप कार्यकर्त्यांना शिवीगाळ झाल्याचा, आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीने शहराची संस्कृती बिगडवून टाकली आहे आणि कार्याक्रमाला गालबोट लावले आहे. राष्ट्रवादीने राजकारण खालच्या स्थरावर नेले आहे, असेही मुळीक म्हणाले.
दरम्यान, वैशाली नागवडेंसह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या काही पुरूष नेत्यांकडून मारहाण झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचा आधारे डेक्कन पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी तिघांवर कलम 323 (मारहाण करणे), 354 (विनयभंग), 504, 506 आणि 34 नुसार कारवाई केली आहे. त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमात काल हा राडा झाला. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या होत्या. हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिरात बसले होते. त्यानंतर स्मृती इराणी बोलायला उठल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.