lockdown| Crime  
पुणे

लॉकडाऊनमध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय का? मग ही बातमी वाचाच

covid 19| lockdown| Crime| त्यावेळची परिस्थीती पाहता नियम मोडणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सरकारनामा ब्युरो

पुणे : कोरोना महामारी (Corona epidemic) काळात ज्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Infectious Diseases Prevention Act) गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्याबाबत राज्य सरकार प्रस्ताव तयार करत असल्याची माहिती पुण्याचे (Pune) सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे (Ravindra Shisve) यांनी दिली आहे. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात तब्बल ४० हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होतेय हे सर्व गुन्हे मागे घेण्यासंदर्भात विचार सुरु असल्याचेही रवींद्र शिसवे यांनी म्हटले आहे.

कोरोना महामारीमुळे राज्यभरात लॉकडाऊन लावण्यात आले. राज्य सरकारने ठरवलेल्या नियमांची अंमलबजावणी पोलीस खात्याने केली. पण त्यावेळची परिस्थीती पाहता नियम मोडलल्या लोकांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावे, हाच या कारवाईचा उद्देश होता.

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात राज्य शरकारने आदेश दिल्यानंतर याबाबतची कायदेशीर तरतूद लवकर प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या लोकांच्या डोक्यावरील टांगती तलवार काढून त्यांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वीही पुणे पोलिसांच्या वतीने न्यायालयात लॉकडाऊन दरम्यानच्या केसेस मागे घेण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात आले. मात्र यासंदर्भातील निर्णय सरकारने घेणे अपेक्षित असल्याने त्यावेळी न्यायलायत याबाबत निर्णय झाला नव्हता.

दरम्यान, मंत्रिमंडळाकडून या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात होईल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. कोविडच्या काळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना इतर कायदेशीर प्रक्रियांसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यासंबंधी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. मंत्रिमंडळाकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर लवकरच नागरिकांवरुन गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT