निलंबित IPS त्रिपाठींचा पाय खोलात; ठाकरे सरकारपाठोपाठ न्यायालयाचाही दणका

सत्र न्यायालयाने त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्रिपाठी हे खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत.
IPS Sourabh Tripathi News
IPS Sourabh Tripathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी (Ransom) वसुली प्रकरणात आरोपी असलेल्या IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी (Sourabh Tripathi) यांना न्यायालयाने दणका दिला आहे. सत्र न्यायालयाने (Court) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्रिपाठी हे खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. तसेच राज्य सरकारनेही त्यांना आठवडाभरापूर्वीच सेवेतून निलंबित केले आहे.

त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून मुंबई पोलीस (Mumbai Police) त्यांचा शोध घेत आहेत. पण अद्याप ते हाती लागलेले नाहीत. त्यांनी अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. सादराणी यांनी त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. सरकारी वकील अॅड. अभिजीत गोंधवल यांनी ही माहिती दिली. (IPS Sourabh Tripathi News)

IPS Sourabh Tripathi News
गडकरींची आजची संसदेतील एन्ट्री ठरली अनोखी अन् सगळ्यांचं लक्ष वेधलं

डीसीपी सौरभ त्रिपाठी हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी वसुली प्रकरणात दोन आठवड्यांपूर्वी त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आधी निंलबन आणि आता न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्रिपाठी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी वसुली (Angadiya Commercial Ransom Case: IPS Saurabh Tripathi police case Filed) प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील ओम वंगाटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

प्रा्प्तिकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून अंगडिया व्यावसाय करणाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणी वसुली केली हेाती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर सौरभ त्रिपाठी हे सुटीवर गेले होते. त्यानंतर सहा दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता पोलीस त्यांच्या शोधात आहेत. त्यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.

IPS Sourabh Tripathi News
वाहनचालकांना दणका! पेट्रोल, डिझेल 9 दिवसांत 8 वेळा महागलं

कोण आहेत सौरभ त्रिपाठी?

त्रिपाठी हे २०१० च्या तुकडीचे अधिकारी असून त्यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. तिथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांनी बंदोबस्तासाठी चांगलं काम केलेले होतं. त्यानंतर मुंबईत परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्रिपाठी यांनी प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात डीसीपी म्हणून काम पाहिलं आहे. त्यांची नियुक्ती परिमंडळ 2 मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती. तिथेच त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले. आरोपानंतर त्यांची बदली डीसीपी ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आली. पण त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com