Girish Bapat sarkarnama
पुणे

Girish Bapat : 'ज्या पुण्याने सांस्कृतिक नेतृत्व..' ; ढासळलेल्या राजकारणावर बापटांनी सुनावले खडे बोल!

Girish Bapat : महिलांबद्दल अपशब्द वापरणे, ही आपली संस्कृती नाही.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : विकासासाठी, सर्वसामान्य माणसाचं हित यासाठी राजकारण केले गेले पाहिजे. मात्र आज हा हेतूच नष्ट होताना दिसत आहे. मागील काही दिवसात राजकारण गढूळ झाले आहे. राजकारण्यांनी पातळी, मर्यादा सोडून, वर्तन होताना दिसत आहे. अगदी पुणे शहरही याला अपवाद नाही. या परिस्थितीचा विचार सगळ्याच पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी विचार केला पाहिजे, असे मत गिरीश बापट (Girish Bapat) यांनी व्यक्त केले.

बापट यांनी सोमवारी फेसबुकच्या माध्यमातून एक ऑडीयो जाहीर केला आहे. शहरातील राजकारणाचा स्तर ढासळत चालल्याच्या मुद्द्यावर टीका केली. पुणे शहरात भटक्या कुत्रे ते ठिकठिकाणी पडलेले खड्डे अशा अनेक प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले. अनेक भेडसावणारे प्रश्नही बाजूला पडले आहेत. हे कामं करण्यास सगळे मागे पडले आहेत. श्रेयवादाच्या लढाईमुळे अनेक कामे कोळंबली आहेत, असे बापट म्हणाले.

शेवगावच्या सभेत राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीपण्णीवर विरोध नोंदवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील कॉंग्रेस भवनमध्ये जाऊन गोंधळ माजवला होता. यानंतर पुणे काँग्रेसचे नेते शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी बापटांना पत्र लिहून राजकारणाचा स्तर ढासळत चालल्याचा दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर बापट यांनी सर्वच कार्यकर्त्यांना ही समज दिली आहे.

महाराष्ट्राला व देशाला ज्या पुणे शहराने सांस्कृतिक आणि राजकीय शिकवण दिली. त्याच पुण्यात आता असे प्रकार घडत आहे, याबाबत आता सर्वच पक्षांनी विचार केला पाहिजे. एखाद्या गोष्टीला विरोध दर्शवणे, तो मुद्देसूद खोडून काढणे, आपली मतप्रदर्शन करणे, असे जे जे संसदीय मार्गात बसते, चौकटीत बसते, त्या कृती करण्यास काही हरकत नाही. मात्र बॅनर लावणे, जोडे मारणे, पुतळे जाळणे, महिलांबद्दल अपशब्द वापरणे, ही आपली संस्कृती नाही, असे खडे बोलही बापटांनी सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT