Guardian Minister : महायुतीमध्ये मंत्रिपदाचे वाटप झाल्यानंतर पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे रायगड, ठाणे, संभाजीनगर, पुणे या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर तीनही पक्षाकंडून दावा केला जातो आहे. विशेषतः पुण्याचे पालकमंत्री अजितदादा होणार की चंद्रकांत पाटील यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
पुण्याच्या पालमंत्रिपदावरून सुरू असलेल्या या सर्व चर्चांना मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पूर्णविराम देत अजितदादाच पुण्याचे पालकमंत्री होतील, असे ठणकावून सांगितले आहे. 'कोणी काही म्हणूद्या या (पुणे) जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवारच होतील.' , असे भरणे म्हणाले.
मंत्रिपदाचे वाटप होऊनही पालकमंत्रिपदाचे वाटप होण्यास उशीर होत असल्याचे बोलले जात आहे. यावर प्रतिक्रिया भरणे म्हणाले, नवीन वर्षा निमित्त नेते मंडळी बाहेर आहेत. ते आल्यावर निर्णय होईल.मात्र, या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार होतील.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी कांग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून बॅनर लावले तर त्यांच्या या बॅनरबाजीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आदिती तटकरे पर्मनंट पालकमंत्री म्हणून बॅनर लावले.
पालकमंत्रिपदाबाबत महायुतीमध्ये सुत्र निश्चित झाल्याची चर्चा आहे. तीनही पक्षांच्या नेत्यांकडून पालकमंत्रिपदाबाबत दावा करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्या पक्षाकडे असे सुत्र ठरवण्याची शक्यता आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, पालकमंत्रिपदावर नेत्यांनी दावा करणे चूक नाही. मात्र, पालकमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र बसून घेतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.