DCM Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Nikhil Wagle Attack : भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंची गाडी फोडली; अजित पवारांचा कडक शब्दांत इशारा

उत्तम कुटे

Pimpri News: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात संतप्त जमावाने हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या. ही घटना शुक्रवारी (ता.9) सायंकाळी घडली. त्यानंतर या घटनेबाबत बोलताना कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर राज्य़ाचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात ही घटना घडल्याने त्यावर त्यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया देत कारवाईचा थेट इशारा दिला. ( Ajit Pawar On Nikhil Wagle Attack News)

फुले-शाहू-आंबेडकरांच्या भूमीत अशा घटना महायुतीचे सरकार खपवून घेणार नाही, असा इशारा अजित पवारांनी वागळेंवरील हल्ल्याच्या प्रकारावर दिला. नवे नाव मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. त्यात त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. त्याला लगेच उत्तर म्हणून अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडचा झंझावाती दौरा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांनी या दौऱ्यात विविध विकासकामांची उद्घाटने आणि भूमिपूजनाचा धडाका लावला. त्यात सांगवी येथे माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी वागळे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर बोलताना कडक शब्दांत इशारा दिला. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार दिलेला नाही. मात्र, ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची सूचना पुणे सीपींना देण्यात येणार आहे, असं पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

तसेच अशा घटना आपल्या भागात घडता कामा नयेत, कारण ती महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा नाही, असेही ते म्हणाले. यापूर्वी उद्योगनगरीत पूर्वीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीची घटना हीसुद्धा राज्याची संस्कृती, परंपरा नाही, अशा घटना राज्याला काळीमा फासण्याचे काम करतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

बारामतीतून सुनेत्रा पवारांना लोकसभेची उमेदवारी देण्याच्या झालेल्या मागणीवरदेखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत त्यावर पक्ष निर्णय घेईल, अशा शब्दांत विषय संपवला, तर परवाच्या शहर दौऱ्यात जयंत पाटील यांनी आगामी लोकसभेला शिरूरमधून तुम्ही आव्हान दिलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच आघाडीचे उमेदवार असतील, असे जाहीर केले.

त्यावर निवडणुकीत घोषणा होतात. त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करावा, महायुती त्यांचा उमेदवार देईल, जनता ज्याला निवडून द्यायचं त्याला देईल, अशी काहीशी मवाळ भूमिका त्यांनी घेतली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं, असा देशातील बहुतांश जनतेचा कल दिसतोय, असा दावाही त्यांनी केला.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT