Devendra Fadnavis and Nikhil Wagle Attack News
Devendra Fadnavis and Nikhil Wagle Attack NewsSarkarnama

Nikhil Wagle Attack : भाजप कार्यकर्त्यांची वागळेंच्या गाडीवर दगडफेक; कारवाई होणार का ? फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis On Nikhil Wagle Attack News : पुण्यातील खंडूजी बाबा चौक येथे निखिल वागळे यांच्या वाहनावर दगडफेक करत अंडी फेकली. तसेच गाडीच्या काचा फोडल्या.
Published on

Pune News : सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि पत्रकार निखिल वागळे यांची पुण्यात 'निर्भय बनो' ही सभा पार पडली. मात्र, या सभेआधी भाजप कार्यकर्त्यांनी पुण्यातील खंडूजी बाबा चौक येथे निखिल वागळे यांच्या वाहनावर दगडफेक करत अंडी फेकली. तसेच गाडीच्या काचा फोडल्या. यामुळे येथे काहीवेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. (Nikhil Wagle Attack News)

निखिल वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळाल्यानंतर ट्विट करून भाजपवर टीका केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली होती. यावरूनच भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांची पुण्यातील 'निर्भय बनो' ही सभा होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis and Nikhil Wagle Attack News
Nikhil Wagle : निखील वागळेंवर पुण्यात हल्ला; 'हे' आहे कारण ?

यानंतर शुक्रवारी सायंकाळी निखिल वागळे हे 'निर्भय बनो' सभेसाठी जात असताना त्यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रतिक्रिया दिली असून कायदा-सुव्यवस्था कोणीही हातामध्ये घेऊ नये, तसेच कारवाई करण्यात येईल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

"कायदा-सुव्यवस्था कोणीही हातामध्ये घेऊ नये, मग भाजपचं कोणी असलं तरी आम्ही त्यांच्यावर कारवाई करु. मात्र, त्याचवेळी लोकांच्या भावना भडकतील, अशा प्रकारचे वक्तव्य करणं, देशाच्या सर्वोच्च नेत्यांना खालच्या स्तरावर जाऊन बोललं, हे देखील अत्यंत चुकीचं आहे. पण ते कितीही चुकीचं बोलले तरी देखील कायदा-सुव्यवस्था राखण्याचं काम आमचं असून पोलिसांचं काम पोलिस चोखपणे पार पाडतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Devendra Fadnavis and Nikhil Wagle Attack News
Nikhil Wagle Attack : भाजप कार्यकर्त्यांकडून निखिल वागळेंच्या गाडीवर दगडफेक; गाडीच्या काचा फुटल्या...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com