Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : अजितदादा राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत; उपमुख्यमंत्र्यांचा उदगीर दौरा रद्द

Ajit Pawar Udgir Tour Cancelled : उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी असल्याने मुंबईत राहून घेणार उपचार आहेत. त्यामुळे त्यांचा लातूर जिल्ह्यातील उदगीर दौरा रद्द झाला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास होत असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय. यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहू शकणार नाहीत. याबाबत राष्ट्रपती महोदयांच्या कार्यालयाला अवगत करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

मराठवाड्यातील ऐतिहासिक नगरी असणाऱ्या उदगीर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज काही कार्यक्रमानिमित्त येणार आहेत. त्यांच्यासोबत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातील नेत्यांची देखील उपस्थिती राहणार आहे.

उदगीर शहराच्या तळवेस भागात असणाऱ्या विश्वशांती बुद्ध विहाराच्या लोकार्पणाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर उदयगिरी कॉलेज मैदानावर आयोजित महिला आनंद मेळाव्याला त्या संबोधित करतील.

राज्य सरकारने या ठिकाणी ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि अन्य लाभाच्या योजनांच्या कार्यक्रमांचा आनंद मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमांमध्ये (BJP) ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होतील. त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमाला हजर राहणार होते, मात्र प्रकृती कारणास्तव त्यांनी आपला दौरा रद्द केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार मागील काही महिन्यांपासून जनसन्मान यात्रा, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची भेट, सरकारी बैठका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सातत्याने राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. आज त्यांचा राष्ट्रपती महोदयांसोबत उदगिरचा दौरा होता.

परंतु ‘ब्रॉन्कायटीस’चे निदान झाल्याने उपमुख्यमंत्र्यांना त्यांचा उदगीर दौरा रद्द करावा लागला. प्रकृतीत सुधारणा होताच ते लवकरच पुन्हा दौरे सुरु करतील. दरम्यानच्या काळात मुंबईतील सरकारी निवासस्थान येथून कामकाज पाहणार आहेत, असेही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने कळविले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT