Uday Samant on Uddhav Thackeray : 'न्यायमूर्तींनाच न्याय देण्याबाबत सल्ले देणारे महाभाग..' ; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

Uday Samant News : 'सार्वजनिक ठिकाणी न्यायालयाचा अवमान करण्याची फॅशन रूढ होत चालली आहे. असंही उदय सामंतांनी म्हटलं आहे.
 Uddhav Thackeray Uday Samant
Uddhav Thackeray Uday Samantsarkarnama
Published on
Updated on

Defamation of judiciary By Politician : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी निशाणा साधला. ‘न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी जनता उघड्या डोळ्यांने पाहात आहे,’ या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा दाखला देत उदय सामंत यांनी न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना लगाम घालण्याची गरज व्यक्त केली. ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा’च्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय वकील परिषदे’त ते बोलत होते.

उदय सामंत(Uday Samant) म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी न्यायालयाचा अवमान करण्याची फॅशन रूढ होत चालली आहे. न्यायमूर्तींनाच न्याय देण्याबाबत सल्ले देणारे महाभाग निर्माण झाले असून, त्याला लगाम घालण्याची गरज आहे. न्यायालयाच्या निकालावर शंका उपस्थित करून न्यायव्यवस्थेची बदनामी करणाऱ्या राजकारण्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.’

 Uddhav Thackeray Uday Samant
Ratnagiri Assembly Election: रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेसाठी कोकणी माणसाची साथ शिंदेंना की ठाकरेंना?

तसेच, ‘आपल्या बाजूने निकाल लागल्यावर न्यायालय चांगले आणि विरोधात निकाल गेल्यावर न्यायालयावर शंका उपस्थित करण्याचे काम राजकारणी करत आहेत. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य जपण्याऐवजी त्याची बदनामी करणाऱ्यांना जाब विचारला गेला पाहिजे,’ असेही सामंत उद्धव ठाकरेंचं(Uddhav Thackeray) नाव न घेता म्हणाले.

 Uddhav Thackeray Uday Samant
VIDEO : Ramdas Athawale - 'या' दोघांचे का होतात राडे?, याचे मला पडले आहे कोडे ; आठवलेंनी काढला चिमटा!

‘राजकीय नेते बदनाम झाले असून, न्यायालयाने एखादा निकाल दिल्यावर राजकारणी पत्रकार परिषदा घेऊन न्यायव्यवस्थेवर ताशेरे ओढतात, ही शोकांतिका आहे. न्यायव्यवस्थेचा आदर ठेवावा आणि बदनामी करू नये, याचे प्रशिक्षण राजकारण्यांना दिले पाहिजे,’ असे म्हणत सामंत यांनी टोलाही लगावला.

तर ‘गुवाहाटीला गेल्यानंतर माझ्या मंत्रिपदात बदल झाला. मी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होतो. तिकडून आल्यानंतर उद्योगमंत्री झालो. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना कायदा विद्यापीठासाठी दीडशे कोटींची तरतूद केली. त्यानंतर तळोजा एमआयडीसीत प्रस्तावित वकील प्रशिक्षण अकादमीसाठी दोन एकर जागा दिली, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com