Daund News Sarkarnama
पुणे

Daund News : दौंड हादरले; एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह भीमा नदीत आढळले

यामध्ये सासू-सासरे, जावई-मुलगी आणि तीन नातवंडांचा समावेश आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा (Bhima) नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह (Dead bodies) आढळून आले. यामध्ये सासू-सासरे, जावई-मुलगी आणि तीन नातवंडांचा समावेश आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. हे कुटुंबीय मूळचे बीड (Beed) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील असून ते मजुरीसाठी नगर (Nagar) जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे आले होते. (Dead bodies of seven people from the one family were found in Daund taluka)

मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), श्याम पंडीत फुलवरे (वय २८ जावई), राणी श्याम फुलवरे (वय २४ मुलगी), रितेश ऊर्फ भैया श्याम फुलवरे (वय ०७), छोटू श्याम फुलवरे (वय ०५), कृष्णा श्याम फुलवरे (वय ०३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी मृतदेह सापडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पवार पती-पत्नी हे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील खामगाव येथील मूळचे आहेत. त्यांचे जावई श्याम फुलवरे व त्यांचे कुटुंबीय हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. ते मजुरीसाठी निघोज येथे आले होते. त्या ठिकाणी एका वर्षापासून ते मोलमजुरीचे काम करत होते. या सर्वांचे मृतदेह पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या पारगाव हद्दीतील भीमा नदी पात्रात आढळून आले आहेत. या ठिकाणापासून नगर जिल्ह्याची हद्द जवळ आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पवार आणि फुलवरे कुटुंबीय हे वर्षभरापूर्वी निघोजमध्ये कामासाठी आले हेाते. हे सर्वजण निघोजमध्ये राहत होते. मात्र, पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात १८ जानेवारी एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर २० जानेवारी रोजी एका पुरुषाचा, ता. २१ जानेवारी रोजी पुन्हा एका महिलेचा मृतदेह, तर २२ जानेवारी पुन्हा एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, पारगाव हद्दीत भीमा नदीत वरील चार मृतदेह आढळून आले, त्याच्या आसपासच आज (ता. २४ जानेवारी) पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले. एका महिलेच्या मृतदेहाजवळ मोबाईल आढळून आला. त्यावर संपर्क साधून नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. नातेवाईकांना दाखवून सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आहे. या सर्व मृतदेहांचे पोस्टपार्टम यवत ग्रामीण रुग्णालय आणि पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT