Cabinet Expansion News : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीत : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदील घेऊन येणार

मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या आमदारांचे डोळे पुन्हा दिल्लीकडे लागले आहेत.
Chief Minister-Deputy Chief Minister
Chief Minister-Deputy Chief MinisterSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज (ता. २४ जानेवारी) दिल्लीच्या (Delhi) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या आमदारांचे डोळे पुन्हा दिल्लीकडे लागले आहेत. शिंदे-फडणवीस हे दिल्लीतून भाजपश्रेष्ठींकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी (Cabinet expansion) हिरवा कंदील घेऊन येतील, अशी आशा या आमदार मंडळींना आहे. (Chief Minister-Deputy Chief Minister in Delhi : HighCommand Will Gave green Singal Cabinet expansion)

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या वतीने दिल्लीत सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना विशेषतः मंत्रिमंडळ विस्ताराच्या अंगाने चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर तो होईल, असे सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाकडून सांगितले जात हेाते. मात्र, अद्यापपर्यंत तरी त्याला मुहूर्त मिळू शकलेला नाही.

Chief Minister-Deputy Chief Minister
Solapur News : शहाजी पाटलांविरोधात शेकापने थोपटले दंड : हस्तक्षेप वाढल्याने सांगोल्यातील सरपंच आक्रमक; लढाईची तयारी

सहकार परिषदेच्या निमित्ताने दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान ते मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात शहा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीतून येताना ते मंत्रिमंडळ विस्तारासाठी पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील घेऊन येतील, अशी चर्चा राज्यात सुरू आहे.

Chief Minister-Deputy Chief Minister
Konkan News : भास्कर जाधवांना गुहारमध्येच मोठा धक्का : ‘खरेदी-विक्री’च्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटाने उडवली दाणादाण

मंत्रिपदासाठी राज्यातील अनेक इच्छूक सध्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. विशेषतः शिंदे गटातील अनेक आमदारांना बंडाच्या वेळी मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेकांचा संयम संपत चालेला आहे. त्यातूनच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट, अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखवली आहे. याशिवाय न बोलताही अनेक आमदार मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने नाराज आहेत. या नाराजीचा भडका उडण्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे इच्छूक आमदारांचे दिल्लीकडे डोळे लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com