Ulhas Dhole Patil Sarkarnama
पुणे

Ulhas Dhole Patil : पुण्याचे माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune former mayor Ulhas Dhole Patil passes away: कोरेगाव पार्क, ताडीवाला परिसरातून १९७४ मध्ये ढोले पाटील यांच्या मित्रांनी त्यांना पालिका निवडणूक लढण्यास भाग पाडले. त्यावेळी ढोले पाटील 'सायकल' चिन्हावर निवडणूक लढले आणि जिंकले देखील.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्याचे माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे वृद्धाप काळाने आज सकाळी निधन झालेले आहे. उल्हास उर्फ नाना ढोले पाटील हे घरोघरी दूध टाकणारे महापौर म्हणून प्रसिद्ध होते. ते सलग सहा वेळा सहा वेगवेगळ्या चिन्हांवर नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकले होते.

त्यांची पत्नी विधानसभेवर निवडून आल्या होत्या. 38 वर्षे ताडीवाला रोड आणि कोरेगाव पार्क या परिसरावर त्यांची निर्विवाद सत्ता होती. कोरेगाव पार्क, ताडीवाला परिसरातून १९७४ मध्ये ढोले पाटील यांच्या मित्रांनी त्यांना पालिका निवडणूक लढण्यास भाग पाडले. त्यावेळी ढोले पाटील 'सायकल' चिन्हावर निवडणूक लढले आणि जिंकले देखील.

पुलोद' सरकारच्या काळात ढोले पाटील पालिकेत अपक्ष म्हणून निवडून आले आणि महापौर देखील झाले. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद वगळता पालिकेतील (Pune Corporation) सर्व समितींच्या अध्यक्षपदाची धूरा त्यांनी सांभाळली होती.

महापौर झाल्यानंतर देखील त्यांनी दुधाचा व्यवसाय सुरू ठेवला होता. ऑस्ट्रेलियातील एका शहराचा महापौर त्या काळात ढोले यांच्या प्रमाणे दूध व्यवसाय करत होता. त्यावेळी शरद पवार यांनी एका भाषणामध्ये त्या महापौराची आठवण सांगत दूध व्यवसाय बंद न करण्याचा सल्ला दिला होता.

हा सल्ला त्यांनी पाळला आणि त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध देखील मिळाली.त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून अडीच वाजता निघणार आहे. अंत्यविधीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता कैलास स्मशानभूमी येथे होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT