Pune Political Updates : पुण्याला काय मिळणार? तीन कॅबिनेट मंत्री फिक्स...; राज्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये सात आमदार !

Who will represent Pune in the state cabinet? : चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पर्वतीच्या माधुरी मिसाळ, खडकवासल्याचे भीमराव तापकीर, दौंडचे राहुल कुल, मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे यांची राज्यमंत्रिपदासाठी नावाची चर्चा आहे.
Pune Vidhansabha Election
Pune Vidhansabha Election Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

बारामतीमधून निवडून आलेले अजित पवार, आंबेगावतील दिलीप वळसे-पाटील आणि कोथरूडचे चंद्रकांत पाटील यांची नावे मंत्रिपदासाठी निश्चित मानली जात आहेत. त्याशिवाय भाजपमधून जिल्ह्यातून एक तर पुणे शहरातून दोन आणि पिंपरी चिंचवड मधून एका आमदाराचे नाव राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेले २१ पैकी १९ आमदार आहेत. त्यामुळे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस,आणि शिवसेना या तीनही पक्षांकडून प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल अशी चर्चा आहे. भाजपकडून शहरात मंत्री आणि जिल्ह्यामध्ये एखादे राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.

Pune Vidhansabha Election
Nana Patole: मोठी बातमी ; नाना पटोलेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; पक्षश्रेष्ठींना आज भेटणार

पुणे जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांनी मुंबईत तळ ठोकला आहे. भाजपाकडून मंत्रिपद देताना भाकरी फिरवली जाणार असल्याचे सांगण्यात येते आहे. चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्याचबरोबर पर्वतीच्या माधुरी मिसाळ, खडकवासल्याचे भीमराव तापकीर, दौंडचे राहुल कुल, मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे यांची राज्यमंत्रिपदासाठी नावाची चर्चा आहे.

Pune Vidhansabha Election
Ajit Pawar : काकांनी घेतली पुतण्याची फिरकी! रोहित, तू थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं...! VIDEO पाहा

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यामध्ये एकच मंत्रिपद ठेवले जाईल, असे सांगण्यात येते. जिल्ह्यात अन्य कोणाला संधी देण्याऐवजी इतर जिल्ह्यांमध्ये बॅलन्स करण्याकडे अजित पवार यांचा कल असल्याचे समजते. तरीदेखील दत्ता मामा भरणे यांचे नाव पुन्हा पुढे आले आहे. शिवसेनेकडून विजय शिवतारे यांचेही नाव चर्चेत आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com