Bazar Samiti Election Latest news|
Bazar Samiti Election Latest news| Sarkarnama
पुणे

Bazar Samiti Election Result 2023: राज्यातील दिग्गजांचे बुरुज ढासळले : बाजार समितीच्या सत्तेतून अनेक प्रस्थापित नेते हद्‌पार

सरकारनामा ब्युरो

Bazar Samiti Election Result Update | राज्यातील 253 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. शुक्रवारी ( २८ एप्रिल) 147 बाजार समित्यांचे मतदान पार पडले. तर आज (29 एप्रिल) या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. यातील 18 बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. उर्वरित 235 बाजार समित्यांपैकी काल 147 बाजार समित्यांसाठी मतदार पार पडलं. या 147 बाजार समित्यांचे आज निकाल जाहीर झाले. (Defeat of veteran leaders of the state in market committee elections)

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यातील अनेक बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. तर अनेक ठिकाणी भाजप आणि शिवेसेनेचा (शिंदे गट) पराभव झाला. या निवडणुकीत अनेक दिग्गजांनाही जोरदार धक्के मिळाल्याचे दिसत आहे.आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार,सुरेश खाडे, संजय राठोड, राणा दांम्पत्य, पंकजा मुंडे, दादा भुसे, तानाजी सावंत, जयदत्त क्षीरसागर, एकनाथ खडसे, बाळू धानोरकर, नाना पटोले, सुनील केदार अशा दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे. (Bazar samiti Elelction)

- परांडा बाजार समितीत मंत्री तानाजी सावंत यांना धक्का देत महाविकास १८ पैकी ११ जागांवर विजय मिळवला आहे. वाशी बाजार समितीत बाजार समितीमध्ये 18 पैकी 12 जागा मिळवून महाविकास आघाडीचा विजय झाला.तर माजी आमदार राहुल मोटे यांच्या पॅनलनेही मंत्री सावंतांच्या पॅनलला धक्का दिला आहे. केवळ भूम कृषी उत्पन्न बाजार समिती मध्येच 6 जागा महायुती आणि 1 जागा महाविकास आघाडीला मिळाली असल्याने याठिकाणी तानाजी सावंतांच्या पॅनलला यश मिळालं आहे.

-भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मोठा धक्का मिळाला आहे. लाखनी-साकोलीमध्ये भाजप राष्ट्रवादी शिवसेना-शिंदे गट पॅनलने १४ जागांवर विजय मिळविला आहे. तर कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. भाजप नऊ, राष्ट्रवादी काँग्रेस पाच आणि काँग्रेसला चार जागांवर विजय मिळाला आहे (Nana Patole Bazar Samiti Elelction)

-बीडमधील परळी वैजनाथ बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने विजयी आघाडी घेतली आहे. परळी बाजार समितीतील 18 पैकी 11 जागांवर धनंजय मुंडेच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पॅनल विजयी झालं आहे. सात जागांचा निकाल अद्याप बाकी आहे. हा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना धक्का मानला जात आहे.

- १७ बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहे. दिग्रसमध्ये मंत्री संजय राठोडांना धक्का बसला आहे. त्याठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. यवतमाळ, लातूर, तिवसा, पुसद, भोर, सिन्नर, पालघर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मंगळवेढा, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या बाजार समित्या भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत. (Sanjay Rathod Bazar Samiti Election result)

- आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पॅनेलचा निसटता पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंढरीनाथ थोरे व भाजपचे डी. के. जगताप यांच्या पॅनेलला नऊ तर भुजबळ यांच्या पॅनलला आठ जागा मिळाल्या. स्वतःच्या मतदारसंघातील निवडणूक असल्याने छगन भुजबळ यांनी ती प्रतिष्ठेची केली होती.

- गेल्या अनेक वर्षापासून बीड बाजार समितीवर (Beed APMC Election) एकहाती सत्ता असलेल्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा जोरदार दणका दिला आहे. बाजार समिती निवडणुकीत १८ पैकी १५ जागा जिंकत काकांचे संस्थान खालसा केले. (Jaydatta kshirsagar)

- कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस ही जिल्ह्यात प्रतिष्ठेची असून यंदाची ही निवडणूक मोठी अटीतटीची झाली. त्यामुळे निवडणूक माजी मंत्री संजय देशमुख व विद्यमान मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती.काल (ता. २८ एप्रिल) झालेल्या निवडणुकीत संजय देशमुख यांच्या पॅनलने १८ पैकी १४ जागांवर विजय मिळवत पालकमंत्री संजय राठोड यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला.

- आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पॅनेलचा निसटता पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंढरीनाथ थोरे व भाजपचे डी. के. जगताप यांच्या पॅनेलला नऊ तर भुजबळ यांच्या पॅनलला आठ जागा मिळाल्या. स्वतःच्या मतदारसंघातील निवडणूक असल्याने छगन भुजबळ यांनी ती प्रतिष्ठेची केली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT