Bazar Samiti Result : पारोळा बाजार समिती : माजी आमदार सतीश पाटलांचा आमदार चिमणराव पाटलांना धक्का

Parola Bazar Samiti : आजी-माजी आमदारांमुळे वाढली होती चुरस
Satish Patil, Chimanrao Patil
Satish Patil, Chimanrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Satish Patil vs Chimanrao Patil : पारोळा बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आघाडीने १५ जागा मिळवून दणदणीत विजय मिळविला आहे. हा विजय मिळवत माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी शिवसेना (शिंदे गट) आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांना झटका दिला आहे. या निवडणुकीत आमदार चिमणराव पाटलांचे चिरंजीव विद्यमान बाजार समिती सभापती अमोल चिमणराव पाटील यांचा पराभव झाला आहे.

Satish Patil, Chimanrao Patil
Bazar Samiti Results : धानोरकरांच्या पराभवासाठी वडेट्टीवार अन्‌ मुनंगटीवार एकत्र : काँग्रेस आमदारानेच केला खासदाराचा पराभव

अटीतटीच्या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena) जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने यांना ४०२ मते मिळाली असून ८६ मताधिक्याने विजयी झाले आहे. सेवा सह सर्वसामान्य गटातून माजी आमदार डॉ. सतीश पाटील (Satish Patil) यांना ४७६ मते मिळाली असून ते विजयी झाले आहेत.

ही निवडणूक दोन्ही आजी-माजी आमदारांनी प्रतिष्ठेची केली होती. दरम्यान, प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी एक प्रतिज्ञा केली होती. ते म्हणाले होते की, या निवणुकीत हरलो तर राजकीय संन्यास घेईन. आता त्यांनी ही निडवणूक जिंकली आहे.

Satish Patil, Chimanrao Patil
Jaykumar Gore News : जिहे-कटापूरचे पाणी पंधरा दिवसात माणमध्ये; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन....

सेवा सहकारी संस्था मतदारसंघ

सर्वसाधारण: नगराज रामभाऊ पाटील (४००), पुरुषोत्तम सीताराम पाटील (३९०), प्रकाश गुमानसिंग पाटील (३८४), बबन खंडेराव पाटील (४२८), रवींद्र रामराव पाटील (४३०), डॉ. सतीश भास्करराव पाटील (४९०), रोहन वसंतराव मोरे (४८५).

महिला राखीव: बबीता संभाजी पाटील (४२३), रेखाताई सतीश राव पाटील (४९५),

इतर मागासवर्गीय: डॉ. हर्षल मनोहर माने (४०२),

विमुक्त जाती भटक्या जमाती: सुरेश शंकर वंजारी (४४५).

Satish Patil, Chimanrao Patil
Pathardi Bazar Samiti Results: मोनिका राजळेंचा प्रताप ढाकणेंना मोठा धक्का; 18 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय

ग्रामपंचायत मतदारसंघ

सर्वसाधारण: मनोराज विश्राम पाटील (३७१), सुधाकर भास्कर पाटील (३९३)

अनुसूचित जाती जमाती: लक्ष्मीबाई दिलीप रामोशी (३६१)

आर्थिक दुर्बल घटक: निंबा बाबूलाल पाटील (३५८)

व्यापारी मतदारसंघ

अनिल पुंडलिक मालपुरे (५५)

जितेंद्र मधुकर शेवाळकर (५५)

हमाल मापाडी मतदारसंघ

राजू भिका मराठे (६७)

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com