Shivsena
Shivsena  Sarkarnama
पुणे

शिवसेनेत वाद पेटला : जिल्हाप्रमुखांवर आरोप करणाऱ्या माजी तालुकाप्रमुखांची हकालपट्टी करा

मनोज कुंभार

वेल्हे (जि. पुणे) : वेल्हे तालुक्यातील शिवसेनेच्या (shivsena) कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे व पक्षशिस्तीचा भंग करणारे कार्यकर्ते दत्ता देशमाने व अंकुश चोरगे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख दीपक दामगुडे यांनी दिली. (Demand for expulsion of former taluka chief Datta Deshmane and Ankush Chorge from Shiv Sena)

याबाबत तालुकाप्रमुख दीपक दामगुडे व विधानसभा संघटक शैलेश वालगुडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या वेळी युवासेनेचे गणेश उफाळे उपस्थित होते. ते म्हणाले की, शिवसेनेकडून तालुकाप्रमुख, विधानसभा संघटक प्रमुख यांच्या नियुक्तीनंतर वेल्हे शिवसेनेमधील काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करून पक्षविरोधी वक्तव्य माजी तालुका प्रमुख दत्ता देशमाने व उपतालुका प्रमुख अंकुश चोरघे करत आहेत. विधानसभा व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात जिल्हा प्रमुख, व माजी तालुका प्रमुख यांनी पक्षाचे काम केल्याचा आरोप खोडून काढत मातोश्रीवरून आलेल्या उमेदवाराचे काम जिल्हा प्रमुख आणि वेल्हे तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिकांनी केले आहे.

दत्ता देशमाने यांनी पक्षाशी गद्दारी केली असून २०१२ मध्ये जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून त्यांनी त्यांची निष्ठा सिद्ध केली आहे. शिवसेना तालुका प्रमुखपदाची जबाबदारी सहा वर्ष संभाळली असताना व जिल्हा परिषद निवडणुकीवेळी पक्षाची अधिकृत उमेदवारी दोनदा मिळूनसुद्धा स्वतःचे अस्तित्व दाखवता आले नाही. वैयक्तिक स्वार्थापोटी पक्षाचे नुकसान करत असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

विधानसभा संघटक शैलेश वालगुडे म्हणाले, ‘‘पक्षाकडून नवनियुक्त तालुकाप्रमुख पदाची निवड झाल्यानंतर नवीन कार्यकारणी तयार केली जाते. हा शिवसेना पक्षाचा नियम आहे, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. या निवडीबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करणे अपेक्षित असताना पक्षाची प्रतिमा मलीन करून पक्ष संघटनेमध्ये संभ्रमावस्था करून फूट पाडण्यासाठी माजी तालुकाप्रमुख दत्ता देशमाने व उपतालुका प्रमुख अंकुश चोरगे यांनी जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. त्यामध्ये तिळमात्रही सत्यता नाही, त्यामुळे त्यांचीच पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी वरिष्ठांकडे करण्यत येणार आहे. वेल्हे शिवसेनेमधील चार ते पाच कार्यकर्ते नाराज असून त्यांची नाराजीसुद्धा लवकरच दूर केली जाईल.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT