Ajit Pawar News Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : आम्ही बैठका घेतल्या तर बिघडले कुठे, मुख्यमंत्र्यांना अडचण नाही ; पण...

NCP News : राज्यात चांगले उद्योग धंदे यावेत म्हणून 'महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन - मित्र' संस्थेची स्थापना केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar Baramati News : राज्यात चांगले उद्योग धंदे यावेत म्हणून 'महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन - मित्र' संस्थेची स्थापना केली आहे. त्या संस्थेची बैठक मी घेतली. त्यानंतर लगेच बातम्या आल्या की मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या संस्थेची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. पण बैठक घेतली तर बिघडले कुठे. बैठक घेतली नाही तर त्या संस्थेमध्ये काय अडचण आहे हे कळत नाही. मुख्यमंत्र्यांना खूप कामे असतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मी काही बैठका घेतल्या तर त्यांचा भार हला होते. त्या बैठकांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना काही अडचण नाही, पण इतर लोकांनाच त्रास होते, असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी बारामतीमध्ये (Baramati) नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, बारामतीत आज जी गर्दी झाली, ती गर्दी अजून मी बघीतली नाही. असे प्रेम मला मिळाले. मला अजून विचार करावा लागेल, सकाळी किती वाजता कामाला सुरूवात करायची. आज तुमचे हे प्रेम बघितल्यानंतर माझा हुरूप वाढला आहे, असेही पवार म्हणाले.

जिल्ह्यातील विमानतळ, मेट्रो, रस्ते ही कामे केल्याशिवाय कायापालट होणार नाही. तुम्ही मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. त्यामुळे मी सकाळीच पाच वाजताच उठतो. तुम्ही झोपेत असतानाच मी कामांची पाहणी करतो. नाहीतर तुम्ही खूप गर्दी करता. त्यामुळे कामांची पाहणी करता येत नाही. अनेक योजना पंतप्रधानांच्या माध्यमातून येत आहेत. तुमच्यामुळे हे सगळे करू शकलो. बारामतीचा विकास करून टाकणार. आपला कोणीही माणूस झोपडीत राहू नये हे माझे स्वप्न आहे, असेही पवार यांनी सांगितले.

तुमच्या करता चांगली कामे करायची आहेत. सध्या निवडणूक होत नसल्याने अनेक कार्यकर्त्यांना पद मिळत नाही. पण काळजी करून नका, निवडणुका झाल्यानंतर पद मिळतील. पण आताची आव्हाने असताना काम करायला हवे. बारामती तालुका विद्येचे माहेरघर म्हणून ओळख व्हायला लागली आहे. आपले जवळचे लांबचे असो सगळ्यांना काम दिले. शेवटी मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, आयएएस, आयपीएस झाले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT