Ajit Pawar Banner News : अजित पवार यांच्या बॅनरवर पुन्हा भावी मुख्यमंत्री ; शरद पवारांचाही फोटो...

NCP News : धाराशिव जिल्ह्यात पुन्हा असे बॅनर लागल्यामुळे त्याची चर्चा होत आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Dharashiv Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्याची त्यांच्या समर्थकांना भलतीच घाई झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून राज्याच्या विविध भागात यापुर्वीही अजित पवार (Ajit Pawar) यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर झळकले आहेत. अगदी असे काही करू नका रे बाबांनो, असे आवाहन स्वतः अजित पवारांनी करून देखील समर्थक काही ऐकायला तयार नाहीत. आता धाराशिव जिल्ह्यात पुन्हा असे बॅनर लागल्यामुळे त्याची चर्चा होत आहे.

विशेष म्हणजे याच बॅनरवर शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोटो देखील आहे. माझा फोटो परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा शरद पवारांनी संभाजीनगर, बीड (Beed) दौऱ्यावर असतांना दिला होता. परंतु हा इशारा काही अजित पवार गटाने फारसा मनावर घेतलेला दिसत नाही. अजित पवार आमचे नेते आहेत, राष्ट्रवादीत फूट पडलीच नाही अशी विधान काल अनुक्रमे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केली होती.

Ajit Pawar
Jalgaon politics : पक्ष कसा सांभाळायचा शरद पवारांकडून राऊतांनी शिकावे : गुलाबराव पाटलांचा टोला

यावरून राज्याच्या राजकारणात संशोधन सुरू असताना आता धाराशिवमध्ये अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या बॅनरवर शरद पवारही झळकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संघटनात्मक बांधणीसाठी धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या हस्ते अजित पवार गटाच्या धाराशिवमधील कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. याच्या तयारीसाठी लावलेल्या बॅनरवर अजित पवारांना भावी मुख्यमंत्री करण्यात आले आहे. ते देखील शरद पवारांच्या साक्षीने.

Ajit Pawar
Beed News : कृषी मंत्र्यांच्या परळीत मिळेना पूर्णवेळ तहसिलदार ; दोन महिन्यात चार...

धाराशिव हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच या गडाला हादरे बसले. नव्याने या गडाची डागडूजी करून इथे अजित पवार गटाची ताकद वाढवण्याची जबाबदारी मंत्री बनसोडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता, या मोहिमेला वेग देण्याचे काम अजित पवार, बनसोडे व त्यांच्या गटाकडून सुरू आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com