Devendra Fadnavis News Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis Latest News : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वीच छावा मराठा महासंघ पदाधिकाऱ्यांची धरपकड

Pimpri-Chinchwad Police : पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवले

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांची उद्घाटने, भुमीपूजने करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे सोमवारी (ता.१५) आले होते. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या छावा संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष गणेश भांडवलकर यांना पोलिसांनी पकडले.

सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवून निगडी पोलिसांनी (Police) भांडवलकर याला अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिली. फडणवीस यांच्या निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात कार्यक्रम होता. तिकडे जाताना त्यांच्या ताफ्याला भांडवलकरने काळे झेंडे दाखवले. म्हणून स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. नंतर गुन्हा दाखल करून अटक केली.

दरम्यान, आरक्षणासह मराठा (Maratha reservation) समाजाच्या अन्य मागण्यांवर १४ मे पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर राज्यातील मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू न देण्याचा इशारा मराठा आरक्षण समन्वय समितीने पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) (आकुर्डी) घेतलेल्या एल्गार परिषदेत ६ मे रोजी दिला होता. आंदोल करू, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आणि उपमुख्यमंत्र्याचा दौरा सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सकाळीच स्थानबद्ध केले.

हा दौरा सुरु होण्यापूर्वीच ते सकाळी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना ठाण्यावर घेऊन आले. त्यात छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर-पाटील, संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांचा समावेश आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांना सोडण्यात आले नव्हते. फडणवीसांचा पुणे (Pune) दौरा संपल्यानंतर त्यांना सोडले जाण्याची शक्यता आहे. मात्र, भांडवलकरविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT