Rahul Narvekar Latest News : राहुल नार्वेकर सर्वप्रथम घेणार 'हा' निर्णय; ठाकरे गटाच्या मागणीवर म्हणाले...

Rahul Narvekar On Supreme Court Decision : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नुकतेच लंडन दौऱ्यावर मुंबईत दाखल झाले आहेत.
Eknath Shinde, Uddhav Thackeray, Rahul Narvekar News
Eknath Shinde, Uddhav Thackeray, Rahul Narvekar NewsSarkarnama

16 MLA Disqualification News : सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे. नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर होते. ते लंडन दौऱ्यावरून मुंबईत दाखल झाले.

या वेळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नार्वेकरांनी (Rahul Narvekar) अपात्रतेच्या निर्णयाबद्दल भाष्य केले. या वेळी नार्वेकर म्हणाले, १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल ज्याकाही याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, ही एक मोठी प्रक्रिया असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले.

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Rahul Narvekar News
Rahul Narvekar Returned To Mumbai :…तर अपात्रतेचा निर्णय घेण्यास विलंब होईल; विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितले

यामध्ये सर्वप्रथम राजकीय पक्ष कुणाचा आहे? याचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच निर्णय घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निर्देश दिले आहे, त्यामुळे घटनेतील सर्व तरतुदींचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल'' विधानसभा अध्यक्षांनी १५ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा, या ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मागणीबाबत नार्वेकर म्हणाले, ''मागण्या सर्वजण करतात. मात्र, कायद्यानुसार काही तरतूदी आहेत, इतरही काही कायदेशीर बाबी आहेत.

आपल्याला निर्णय घेण्यासाठी घाई करायची नाही व विलंबही करायचा नाही. जो निर्णय होईल, तो निर्णय संविधानातील तरतुदी व न्यायालयाच्या निर्देशानुसारच घेतला जाईल, असेही नार्वेकरांनी स्पष्ट केले. सभागृहाच्या बाहेर केलेल्या भाष्यांवर मी बोलणार नाही. मला तशी टिप्पणी करायची गरज नाही. कुणी १५ दिवस, कुणी २० दिवस तर काहींनी दोन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याची मागणी केली. मात्र, मी याकडे लक्ष देत नाही.

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Rahul Narvekar News
Rahul Narvekar Returned To Mumbai: मुंबईत पाय ठेवताच राहुल नार्वेकरांनी वाढवले ठाकरेंचे टेन्शन; भरत गोगावलेंच्या नियुक्तीवर म्हणाले...

मी कायद्यातील तरतुदीनुसारच निर्णय घेणार, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुणाच्या मनासारखे व्हावे म्हणून निर्णय घेणार नाही. १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण झाली तर १५ दिवसांत निर्णय घेऊ, प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागला, तर निर्णय घेण्यास विलंब होईल, असे सूचक विधान नार्वेकरांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com