Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis : राम मंदिर सोहळ्यामुळे काहींना पोटशूळ; फडणवीसांनी लगावला टोला!

Jitendra Awhad : 'प्रसिद्धीची एवढी हाव माणसाला असू नये, शेवटी...' असं म्हणत आव्हाडांवर निशाणा साधला आहे.

सरकारनामा ब्युरो

सचिन देशपांडे -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात बोलताना, अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भावना व्यक्त केल्या. तसेच, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'हे केवळ मंदिर नाही. तर पाचशे वर्षे जो कलंक आमच्या छातीवर उभा केला होता. तो कलंक आम्ही 1992 मध्ये मिटविला होता. त्यानंतर आमच्या आराध्य दैवतेची स्थापना योग्य प्रकारे करता आली नव्हती. आता प्रभू श्रीरामाचा जन्म झाला त्या ठिकाणी 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असून, नवीन अस्मिता, नवीन ओळख आम्हाला मिळणार आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय 'आपले स्वप्न रामराज्याचे आहे. रामराज्य म्हणजे काय समाजातील जो पीडित, वंचित, शोषित आहे त्याला राज्यामध्ये महत्त्व मिळते. त्याचा आवाज राज्यात ऐकला जातो, त्याच्यासाठी जे राज्य चालते ते रामराज्य. जसे छत्रपती शिवरायांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) रयतेचे राज्य हे रामराज्याच्या संकल्पनेतून उभे राहिले होते. मला विश्वास आहे, या राम मंदिरापासून पुढील काळात अशाच प्रकारच्या रामराज्याची संकल्पना भारतात आणि आपल्याला महाराष्ट्रात निश्चितपणे पाहता येईल,' असा दावा फडणवीस यांनी केला.

राम मंदिर उद्घाटनामुळे काहींना पोटशूळ झाला आहे, अशी टीका नाव न घेता फडणवीसांनी आव्हाडांवर (Jitendra Awhad) केली. 'राम बहुजनांचे नेते होते, ते नॉनव्हेज खात होते, असे एक नेते म्हणाले. कुठून अक्कल आणतात हे समजत नाही. प्रसिद्धीची ऐवढी हाव माणसाला असू नये. शेवटी करोडो लोकांच्या आस्थेचे प्रतीक आहे. बहुजनाचे नेते, मांसाहार काय संबंध आहे. आमचे वारकरी, आमचे टाळकरी, आमचे माळकरी, आमचे धारकरी सगळे शाकाहारी आहेत. ते आता बहुजन राहिले नाहीत काय? असा प्रश्नच देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

तसेच, वेड्यासारखे बोलायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, अशी टीका फडणवीस यांनी केली. अशा वाचाळवीरांनासुद्धा प्रभू श्रीराम सुबुद्धी देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT