Jitendra Awhad News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात पहिला गुन्हा दाखल

FIR Controversial statement- हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याची तक्रार
Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 154 फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी 'प्रभू श्रीरामचंद्र हे 14 वर्षे वनवास भोगत असताना मांसाहार करत होते. तसेच प्रभू श्रीरामचंद्र हे बहुजनांचा राम शिकार करुन खाणारा राम, राम हा शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता', असे वक्तव्य केले होते. आढाव यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात संतापाची मोठी लाट उसळली होती. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आव्हाड यांनी हे वक्तव्य केले होते. त्यामुळे ठाणे, मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्येही आव्हाड यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होत असून जाती-धर्मामधील सामाजिक सलोखा बिघड असल्याचे सांगत भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशाची धार्मिक सलोखा, अखंडता बाधित करण्याकरीता त्यांनी हिन्दू धर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन जनतेच्या धार्मिक भावना दुखवल्याचे घाटे यांनी केलेल्या तक्रारीत म्हंटले होते. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेला हा पहिला गुन्हा असून पुढील काळात या प्रकरणात इतर शहरांमध्येही आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत जागोजागी आंदोलन देखील केले होते. तसेच शहरातील सिंहगड पोलिस स्टेशनसह इतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल करून तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. झालेल्या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी आव्हाड यांनी दिलगीरी देखील व्यक्त केली होती. त्यानंतर हे प्रकरण जरा शांत झाले होते.

Jitendra Awhad
Pune Crime News : लग्नाच्या वाढदिवसालाच कुख्यात गुंड शरद मोहोळचा 'गेम'; गोळीबारात मृत्यू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com