Ajit Pawar sarkarnama
पुणे

अजित पवारांचा मुख्यमंत्री योगींना संदेश; म्हणाले...

बॉलिवूडला उत्तर प्रदेशात हलवण्याचा डाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत.

सरकारनामा ब्युरो

पुणे : मागील काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Aditynath) यांनी मुंबईत येत उत्तर प्रदेशात बॉलीवूडसाठी (Bollywood) सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या व आता आर्य़न खानच्या अटकेनंतर मुंबईत बॉलीवू़डला (Mumbai Bollywood) बदनाम करून उत्तर प्रदेशात हलवण्याचा डाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे.

कोरोना संकटानंतर तब्बल 19 महिन्यानंतर शुक्रवारपासून (ता. 22) राज्यातील नाट्यगृह सुरू होत आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अजित पवार यांच्या उपस्थितीत याची सुरूवात करण्यात आली. यावेळी बोलताना पवार यांनी मुंबईतील बॉलिवून बाहेर जाऊ देणार नाही, असं स्पष्ट केलं. सरकारकडून सर्व सहकार्य केले जाईल. सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असं सांगत पवारांनी बॉलिवूडला मुंबईतच राहणार असं ठणकावून सांगितलं.

नाट्यगृह सुरू करतानाची सरकारी भूमिका स्पष्ट करताना पवार म्हणाले, या काळात चुका होऊन तिसरी लाट येऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगता आले पाहिजे, यासाठी सरकारचे नेहमीच प्रयत्न असतात. त्यामुळेच नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामध्ये वाढ झाली नाही तर दिवाळीनंतर 100 टक्के उपस्थितीचाही निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

कोरोना काळात निर्माते, दिग्दर्शक, कलाकार सर्वांनीच खूप सहन केले आहे. या काळात बालगंधर्व रंगमंदिर 19 महिने बंद होते. त्यामुळे सध्यातरी नुतणीकरणाबाबत पुनर्विचार करण्यात येईल. याबाबत महापौर व आयुक्तांशी चर्चा करू. रंगमंदिर या काळात पाडले तर येथील नाटकं बंद होतील, असंही पवार म्हणाले. नुतणीकरणाबाबत दोन प्रवाह असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात 100 कोटी लशीचे डोस दिले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जगात कुठे लसीकरण झालेले नाही. मुळशी तालुक्याने 100 टक्के लसीकरण केले आहे. हे करणं गरजेचे आहे, असं पवार म्हणाले. राज्य सरकारकडून कोरोनो रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. आपल्या सर्वांचे सहकार्यही अपेक्षित असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT