नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून देशात सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या (Petrol-Diesel Prices) दरात वाढ होत आहे. बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. पण अनेक भाजप (BJP) नेत्यांकडून दरवाढीचे समर्थन केले जात आहे. तर काही नेत्यांकडून दरवाढीवर लोकांनाच उलटा सवाल केला जात आहे. उत्तर प्रदेशातील भाजपच्या मंत्र्यांनीही लोकांच्या उत्पन्नावरच बोट ठेवलं.
उत्तर प्रदेशातील भाजपचे मंत्री उपेंद्र तिवारी (Upendra Tiwari) यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, मागील सात वर्षात लोकांचे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढली असली तरी केवळ मुठभर लोकांनाच पेट्रोल गरज आहे. जे कार वारतात, त्यांना ही गरज आहे. तर 95 टक्के लोकांना पेट्रोलची गरज नाही. प्रतिव्यक्ती उत्पन्नाचा विचार केल्यास पेट्रोल व डिझेलचे दर कमी आहेत. शंभर कोटींहून अधिक लोकांना मोफत लस देण्यात आली आहे. मोफत उपचार करण्यात आले आहेत. घरोघरी औषधं वाटली जात आहेत. मोफत शिक्षण दिले जात आहे, असं तिवारी म्हणाले आहेत.
दरम्यान, आसामचे भाजप प्रदेशाध्यक्ष भावेश कलिता यांनीही नुकतीच एक घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले की, पेट्रोलचा दर प्रतिलिटर 200 रुपयांजवळ पोचल्यानंतर राज्यात दुचाकीवर ट्रिपल सीट जाण्यास आसाम सरकार परवानगी देणार आहे. पेट्रोल 200 रुपयांवर गेल्यानंतर आम्ही दुचाकीवर ट्रिपल सीट जाण्यास परवानगी देऊ. याचबरोबर तिघे बसू शकतील, अशा दुचाकींचे उत्पादनही घेण्याची सूचना केली जाईल.
लोक इंधन बचतीसाठी लक्झरी कार चालवण्याऐवजी एकाच दुचाकीवर तिघे बसून जाण्यास प्राधान्य देतात, असे विधान कलिता यांनी केले होते. यावरून गदारोळ उडाल्यानंतर त्यांनी हा खुलासा केला आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट अधिकृतपणे जाण्यास परवानगी देण्याची सरकारी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी पेट्रोलचा दर प्रतिलिटर 200 रुपयांच्या जवळ जाण्याची अट घातली आहे. त्यांच्या या अजब घोषणेवरूनही आता वाद सुरू झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचे भाव मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळी आहेत. खनिज तेलाचा भाव वाढल्याने आगामी काळात देशात इंधन दरवाढीचे चक्र कायम राहणार आहे. आगामी काळात हे चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे. चालू महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 दिवस वाढ करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.