Manchar Bazar Samiti-Devdatt Nikam Sarkarnama
पुणे

Manchar Bazar Samiti Election: दिलीप वळसे पाटलांना धक्का; उमेदवारी नाकारलेल्या देवदत्त निकमांनी ठोकले शड्डू

Devdutt Nikam Formed a Separate Panel: पुण्यातील मंचर बाजार समितीच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.

सरकारनामा ब्युरो

Manchar Bazar Samiti News: पुण्यातील मंचर बाजार समितीच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse-Patil) यांचे कट्टर समर्थक देवदत्त निकम यांनी वेगळी चूल मांडली आहे. निकम यांनी आपला वेगळा पॅनल उभा केला आहे. याममुळे आता निकम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. (Manchar Bazar Samiti Election)

मंचर बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसध्ये गटबाजी उफाळून आली आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर देवदत्त निकम यांनाच पक्षाने उमेदवारी नाकारण्यात आली. पण दिलीप वळसे पाटलांचा फोटो वापरून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे निकम यांनी जाहीर केलं. पक्षातील सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरणे, त्यांच्या मुलाखती घेणे. अशा सर्व प्रक्रियांमध्ये मी सहभागी होतो. पण मला उमेदवारी नाकारल्याने हा माझ्यासाठी मानसिक धक्का होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (Dilip Walse-Patil News)

मी १९९० पासून आतापर्यंत निष्ठेने काम केले आहे. देशातील पहिली डिजिटल बाजार समिती केली. गेली सहा वर्ष शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळून देण्यासाठी तसेच शेती मालाला निवारा उपलब्ध होण्यासाठी काम केले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समवेत आज (ता. २० एप्रिल) सकाळी चर्चाही केली. त्यांना आपण निवडणुकीतून माघार घेणार नाही, असेही सांगितले होते. त्यांनी तुम्हाला कळवतो, असे सूचित केले. पण नंतर त्यांनी आणि पक्षानेही माझ्याशी संपर्क केला नाही, अशी भावना देवदत्त निकम यांनी बोलून दाखवली.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT