Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीसांचं महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठे विधान; इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली

Political News : सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. त्यातच पुणे दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठे विधान केले आहे.

Sudesh Mitkar

Political News : आगामी काळात होत असलेली विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महायुती व महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. त्यातच पुणे दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठे विधान केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, महायुतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. या विषयावर आम्ही आता पुढे चाललो आहोत. लवकरच जागा वाटपाचे सर्व काम पूर्ण करून घोषणा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. (Devendra Fadnavis News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 3 वंदे भारत ट्रेन भेट दिल्या आहेत. या तीन ट्रेनमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास गतिमान आणि सुखकर होणार आहे. वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे. भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आभार मानतो, असेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुणे शहरात वारंवार गोळीबाराच्या घटना घडत आहेत. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी गोळीबार झाला. त्याबाबत गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही पाहिले आहात, कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही. तात्काळ शोधून काढतो. ठोकून काढतो म्हणजेच जेलमध्ये टाकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गजा मारणे व चंद्रकांत पाटील (Chandarakant Patil) यांच्या भेटीविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, आता इथं इतके लोक आहेत. कोण माझ्याबरोबर फोटो काढेल कोण मला हार घालेल कळत नाही. परंतु माहिती असताना असा प्रकार होऊ नये अशी अपॆक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासोबतच माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांबरोबर चर्चा करून, सकारात्मक रोड मॅप तयार केला आहे. त्यामुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा लवकरच मार्गी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT