Mahayuti News : अखेर शिरसाट, अडसूळ यांची इच्छापूर्ती; शिंदे सरकारकडून मोठं बक्षीस; गोगावलेंचं काय ?

Political News : महामंडळ वाटपात शिवसेनेच्या या तीन नेत्यांना मोठी संधी देण्यात आली आहे. या यादीत अजित पवार गट आणि भाजप पक्षातील एकाही नेत्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
Ananad Adsul, Hemant patil, Sanjay shirsat
Ananad Adsul, Hemant patil, Sanjay shirsat Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामंडळांचे वाटप केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये राज्य सरकारने शिवसेनेच्या मंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या तीन बड्या नेत्यांना मोठी संधी दिली. राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी महामंडळांचं वाटप करण्यात आले आहे.

यामध्ये आतापर्यंत केवळ तीन नेत्यांची नावे समोर आले आहेत. विशेष म्हणजे महामंडळ वाटपात शिवसेनेच्या या तीन नेत्यांना मोठी संधी देण्यात आली आहे. या यादीत अजित पवार गट आणि भाजप पक्षातील एकाही नेत्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर राज्य सरकारने मोठी जबाबदारी दिली आहे. संजय शिरसाट यांची शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेले नांदेडचे माजी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil ) यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Ananad Adsul, Hemant patil, Sanjay shirsat
Mahayuti News : लातूर जिल्ह्यातील जागा वाटपावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा; शिंदे गटाचा या दोन जागेवर दावा

एकनाथ शिंदे गटाचे संजय शिरसाट, भरत गोगावले आणि इतर काही नेते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यानच्या काळात अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले. त्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला जाणाऱ्या मंत्रिपदांच्या संख्येत आणखी एक वाटेकरी वाढला आहे. अजित पवारांच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने नंतरच्या काळात शिंदे गटातील इच्छुक आमदारांची संधी हुकल्याची चर्चा आहे.

आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता कमी

आता हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांची हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदावर वर्णी लागली. तर संजय शिरसाटांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामुळे आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता अगदी कमी झाली आहे. गेल्या काही काळापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होणार अशी सातत्याने चर्चा आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण आता विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे किमान महामंडळावर तरी वर्णी लागावी यासाठी काहीजणांनी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे.

Ananad Adsul, Hemant patil, Sanjay shirsat
MVA News : अखेर 'मविआ'चा फॉर्म्युला ठरला? काँग्रेसच मोठा भाऊ; कोणत्या पक्षाला किती जागा?

दरम्यान, हेमंत पाटील यांनी मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “राज्य सरकारच आभार मानतो कि मला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला. मी गेल्या अनेक वर्षांपासून हळद पिकावर काम करत आहे. याची दखल घेऊन मला हे पद देण्यात आलं. माझं राजकीय पुनर्वसन व्हायचं बाकी आहे. विधानसभेसाठी शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो मान्य आहे”, अशी प्रतिक्रिया हेमंत पाटील यांनी दिली आहे.

Ananad Adsul, Hemant patil, Sanjay shirsat
Aditi Tatkare News : महिलांसाठी आर्थिक सुरक्षा महत्त्वाची; आदिती तटकरेंनी दिले विरोधकांच्या टीकेला उत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com