Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis At Bhosari : 'चला, चला निवडणूक आली, भूमिपूजन आणि उद्घाटनाची वेळ झाली'

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri- Chichawad Loksabha Constituency : लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असल्याने विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाचा सध्या सपाटा सत्ताधाऱ्यांनी लावला आहे. बरोबर महिन्यापूर्वी (9 फेब्रवारीला) उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये त्यासाठी आले होते, तर आज संध्याकाळी 9 मार्चला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात त्याकरिताच येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजितदादांच्या मागील महिन्यातील शहर दौऱ्यात त्यांनी आपल्या पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांचा पिंपरी आणि भाजपच्या आमदार अश्विनी जगताप Ashwini Jagtap यांच्या चिंचवड मतदारसंघातील विविध विकासकामांची उद्घाटने आणि भूमिपूजन केले होते. त्यावेळी कामे पूर्ण झालेली असूनही आमदार महेश लांडगेंच्या Mahesh Landage भोसरी या शहरातील तिसऱ्या मतदारसंघातील प्रकल्पांची उद्घाटने आणि भूमिपूजनही केली गेली नाहीत. त्यासाठीच खास फडणवीस हे महिन्यात पुन्हा शहरात येत आहेत. भोसरीतील 12 कामांची उद्घाटने, तर सात प्रकल्पांचे भूमिपूजन ते करणार आहेत. चिखली येथील टाऊन हॉलचे सायंकाळी सात वाजता उद्घाटन केल्यानंतर तेथूनच इतर कामांची उद्घाटने आणि भूमिपूजन ते ऑनलाइन करणार आहेत.

लांडगे हे फडणवीसांच्या गुड बुकातील आमदार आहेत. त्यातून तेच नाही, तर त्यांच्या होम मिनिस्टरही लांडगेंच्या इंद्रायणी थडी या वार्षिक जत्रेला आवर्जून हजेरी लावतात. देशातील सर्वात मोठ्या आणि पाच दिवस चाललेल्या दीड कोटी रुपयांची बक्षिसे असलेल्या लांडगेंच्या बैलगाडा शर्यतीसाठीही फडणवीस Devendra Fadnavis आले होते.

भोसरी हे शिरूर लोकसभा मतदारसंघात असून, तेथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार Sharad Pawar पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आहेत, तर या वेळी आपला खासदार निवडून आणण्यासाठी युतीने चंग बांधला आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवडसह chinchwad पुणे शहरही त्यांनी आपल्या रडारवर घेतले आहे. त्याच्या तयारीचा एक भाग म्हणून अजितदादा आणि फडणवीसांनी व्यूहरचना सुरू केली आहे. त्यातून नंतर होऊ घातलेली विधानसभा आणि महापालिका निवडणुकीची साखरपेरणीही ते करीत आहेत.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT