Pune MNS News : पुणे लोकसभा लढवणार का? वसंत मोरेंच्या विधानानं नवा ट्विस्ट

Vasant More वसंत मोरे यांनी ठेवलेल्या व्हॉटस॒ॲप स्टेटस॒मुळे चर्चेला उधाण आले आहे. शर्मिला ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर काही तासांतच मोरेंनी अशा पद्धतीने स्टेटस॒ ठेवल्याने खळबळ उडाली आहे.
Vasant More
Vasant MoreSarkarnama
Published on
Updated on

Pune Manse News : पुणे लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले असून, सध्या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचेही दौरे वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेचे पुण्यातील धडाडीचे नेते वसंतराव मोरे यांनी लोकसभा लढविण्याचे संकेत दिले आहेत. मनसे पक्षाचा आज वर्धापन दिन असून, त्यानिमित्त नाशिक येथे आयोजित कार्यक्रमाला वसंतराव मोरे आवर्जून उपस्थित राहिले आहेत.

वसंत मोरे यांनी याबाबत व्हाॅट॒सॲप स्टेटस ठेवले असून, त्यातून मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांत चर्चेला उधाण आले आहे. पुणे लोकसभेची निवडणूक मी लढण्यास तयार असून, राज ठाकरे यांनी मला संधी दिली, तर मनसेचा पहिला खासदार पुण्यातून होण्याचा मान मिळवेन, असे वसंतराव मोरेंनी स्पष्ट केले आहे.

ते म्हणाले, मनसेचा वर्धापन दिन नाशिकात साजरा होत असताना येथील राज ठाकरेंच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आले आहे. लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) जो निर्णय घेतील तोच अंतिम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी नुकताच पुणे दौऱ्यात बोलताना साईनाथ बाबर यांना मोठी संधी देण्याचे सूतोवाच केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vasant More
Maan Manse News : मनसेची माणमध्ये 'एक सही संतापाची' मोहिम...

यानंतर आता वसंत मोरे यांनी ठेवलेल्या व्हॉट्स॒ॲप स्टेटस॒मुळे चर्चेला उधाण आले आहे. शर्मिला ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर काही तासांतच मोरेंनी अशा पद्धतीने स्टेटस॒ ठेवल्याने खळबळ उडाली आहे. कुणसाठी कितीबी करा, वेळ आली की फणा काढतातच. पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्यवेळी सगळी गाणी वाजवणार, हा संदेश नेमका कोणाला यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com