Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या सत्तेतील एन्ट्रीमुळे राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्याचमुळे महाविकास आघाडीप्रमाणेच आता महायुतीतही लोकसभेसाठीचं जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
यातच आता महायुतीत भाजपनं मिशन ४५ निश्चित केले असतानाच दुसरीकडे शिंदे गटाकडून लोकसभेसाठी २२ जागांवर दावा केला आहे. याच दाव्यावर महायुती सरकारचे 'शिल्पकार' अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) बुधवारी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी जागावाटपावर भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही तीनही पक्ष एकत्रित बसू आणि लोकसभेच्या जागावाटपाबाबतचा निर्णय घेऊ. अद्याप कुणीही काहीही मागितलं नाही, ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ, असेही त्यांनी सांगितले.
भाजपप्रणित महायुतीतील जागावाटपाकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी महायुतीत शिवसेनेसाठी 2३, तर भाजपसाठी 25 जागा असा फॉर्म्युला ठरला होता, पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीवरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
पण आता महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना 22, तर भाजप 25 जागांवर दावा ठोकत लढण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या गटानेदेखील लोकसभेसाठी २२ जागांवर दावा ठोकला आहे. यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडणार आहे.
शिंदे गट २२ जागांवर अडून राहिल्यास भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला किती जागा मिळतील, असा प्रश्न आहे. भाजपचे सध्या २३ खासदार आहेत, तर अजित पवार गटाबरोबर राष्ट्रवादीच्या चारपैकी सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत. अजित पवार गटाला सहा ते सात जागा हव्या असल्याचे सांगितले जाते.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे(Rahul Shewale) यांनी 48 पैकी 22 जागांवर दावा ठोकला आहे. त्यात गेल्या वेळी निवडून आलेले जे 13 खासदार आहेत, त्या 13 जागा भाजप सोडण्यास तयार असल्याचं सांगितलं जातंय, पण सत्तेत अजित पवार सामील झाल्यानंतर त्यांनाही लोकसभेच्या काही जागा द्याव्या लागतील. त्यामुळे 48 जागांचे वाटप कसं करायचं हा प्रश्न आहे. भाजपने राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.