Ajit Pawar, Devendra Fadnavis News Sarkarnama
पुणे

Video Devendra Fadnavis : अजितदादांसोबत युती का केली? फडणवीसांनी सांगितली शिवरायांची नीती

Akshay Sabale

BJP state conclave in Pune : 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडत एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. यानंतर 2023 ला अजित पवार यांनीही काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता.

पण, छत्रपती शिवाजी महाराज यांची नीती सांगत अजितदादांना सोबत घेण्याचं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते पुण्यात भाजपच्या 'चिंतन' बैठकीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "भाजपचे ( bjp ) 90 टक्के कार्यकर्त्यांना काहीच मिळणार नाही, हे माहिती आहे. तरीही ते काम करतात. कारण, ते व्यक्तीसाठी नाहीतर विचारांसाठी काम करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना आपण सगळेजण मानतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी एक पाऊल पुढे टाकलं, तर कधी एक पाऊल मागे घेतलं. कधी मान-अपमान, तह, सलगी सगळ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी केल्या. पण, हिंदवी स्वराज्याची स्थापना हेच त्यांचं ध्येय होते."

"आपणंही अनेक गोष्ट केल्या. वेगळ्या परिस्थितीत सरकार स्थापन केलं. वेगवेगळे मित्र सोबत जोडले. काहींना आवडलं काहींना आवडलं नसेल. मात्र, सत्ता मिळवणे एवढाच आपला उद्देश नव्हता. महाराष्ट्रात ज्यावेळी आमच्या सामान्य कार्यकर्त्यावर अत्याचार होत होता, त्यावेळी आपण हे परिवर्तन घडवलं. हे परिवर्तन घडवताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आणि विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले," असं फडणवीसांनी म्हटलं.

"नंतरच्या काळात अजितदादा ( Ajit Pawar ) यांना आपण सोबत घेतलं. खरंय आपण राष्ट्रवादीसोबत खूप संघर्ष केला आहे. त्यामुळे अनेकांना वाटलं, ज्याच्यासोबत संघर्ष झाला, त्यांच्याशी सलगी कशी करायची? पण, ध्येय जेव्हा स्पष्ट असतं, तेव्हा त्या ध्येयाकडे जाताना कधी दोन पावले पुढे किंवा दोन पावले मागे यावं लागतं. कधी तह करावा लागतो. कधी सलगी करावी लागते. मला 'सागर' बंगला मिळावा म्हणून हे सरकार आणलं नाही. तर नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत. त्यांच्या वाटचालीत महाराष्ट्र त्यांच्यासोबत राहिला पाहिजे. म्हणून हे परिवर्तन केलं आहे," असं फडणवीस म्हणाले.

"आपल्या मनातील किंतू-परंतु काढून टाका. आमच्याकडून काही चुका घडल्या असतील, तर त्या पोटात घातल्या पाहिजेत. कारण, आम्हीही तुमच्यासारखे कार्यकर्ते आहोत. पद मिळालं म्हणून आम्ही मोठे झालो नाहीत. आम्हीही कार्यकर्ते आहोत. पण, नुसत्या चर्चा करायच्या निगेटिव्ह बोलण्याचा कारभार काहीजण करतात. त्यांना हात जोडून विनंती आहे, जे लोकं निष्ठेनं काम करतात त्यांच्या मनात विष कालवण्याचं काम करू नका. आजही हा पक्ष निष्ठावतांवर उभा आहे. एखाद्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या की पक्षासोबत कोण आणि कोण नाही, हे समजतं," असं फडणवीसांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT