Video Devendra Fadnavis : आदेशाची वाट पाहू नका, ठोकून काढा; देवेंद्र फडणवीसांचे फर्मान

BJP Adhiveshan Devendra Fadnavis : फेक नेरेटिव्हला फेक नेरेटिव्हने उत्तर देऊ. विरोधकांच्या खोट्या नेरेटिव्हला बळी पडू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : विधानसभेच्या निवडणुकीची तयारी भाजपकडून करण्यात येत आहे. निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग भाजपने आज (रविवार) पुण्यातील अधिवेशनाने फुंकले. भाजपने सकाळ-संध्याकाळ विरोधकांना उत्तर देण्यासाठी नेत्यांची यादी जाहीर केली. आता याच्याही पुढे जात देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना मोठा आदेश दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा'. कार्यकर्त्यांनी आदेश देताना सावधगिरी बाळगण्याची सूचना देखील फडणवीस यांनी केल्या.

'ज्याल बॅटींग करायची त्याने करावी पण अट एकच हिट विकेट होऊ नका. कारण समोरच्यावर बोलण्यापेक्षा आपल्यावर बोलला तर पुढीच चार दिवस त्याचे उत्तर देत बसावे लागेल.'असे फडणवीस म्हणाले.

फेक नेरेटिव्हला फेक नेरेटिव्हने उत्तर देऊ. विरोधकांच्या खोट्या नेरेटिव्हला बळी पडू नका. भाजपचे कार्यकर्ते किती आहेत ते पाहा. प्रत्येक कार्यकर्त्याने एक जरी पोस्ट सोशल मीडियावर केली तर विरोधकांचा खोटा नेरेटिव्ह वाहून जाईल. असा दावा फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Video BJP Adhiveshan : अन् फडणवीसांनी थेट तारीखच दिली!; भाजपच्या अधिवेशनात केली मोठी भविष्यवाणी

जिंकतो किंवा शिकतो

लोकसभा झालेला पराभव हा अवघ्या काही मतातील पाॅईंटच्या फरकामुळे झाला आहे. भाजपचे 12 उमेदवार हे अवघ्या 3 टक्क्याच्या फरकाने पराभूत झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडीचा फुगा आम्ही विधान परिषदेला फोडला. आम्ही पराभवाने निराश कधी होत नाही. कारण आम्ही जिंकतो किंवा शिकतो, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule : प्रत्येक बुथवर 10 मतांची गरज, महायुती 200 हून अधिक जागा मिळवेल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com