Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  sarkarnama
पुणे

'महाविकास आघाडी काय करायचं ते करा, निवडणुका तर आम्हीच जिंकू'

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : "राज्यातील सरकारला महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) म्हणायचं की महावसुली सरकार म्हणायचे हा प्रश्न आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात मेट्रो सुरू झाली. याचे श्रेय घ्यायला अनेक लोक येतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यामुळे ही मेट्रो झाली आहे. आम्ही पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे. आता हे वॉर्डबदल वैगेरे करत आहेत. तुम्ही काय करायचं ते करा जनता बघतेय. मात्र, आगामी निवडणुकीत आम्हीच जिंकू", असा विश्वास भाजप (BJP) नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी (ता.६ मार्च) पिंपरी-चिंचवडमध्ये व्यक्त केला. ते येथील विविध कामांच्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांची सुरूवात रविवारी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अमित गोरखे, उमा खापरे, नगरसेवक एकनाथ पवार, अनुराधा गोरखे, राहुल जाधव, कुंदन गायकवाड, केशव घोळवे, राजू दुर्गे, उत्तम केंदळे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड येथील विकास कामाचे उद्घाटन करण्यासाठी काल फडणवीस शहरात आले होते. त्यावेळी अटलबिहारी वाचपेयी उद्यानाचे उद्घाटन त्याच्या हस्ते करण्यात आले. मात्र यावेळी शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या उद्यानाचे काम अर्धवट असल्याचा आरोप करत आंदोलन कले आणि जोरदार घोषणाबाजी केली. यास प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा घोषणा दिल्या यामुळे येथील वातावरण कमालीचे तापले होते. येथील जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. यावेळी फडणवीसांचा ताफा येथे येत असतांना त्यांच्या ताफ्यावर चप्पल आणि बांगड्या फेकण्याचाही प्रकार येथे घडला.

उद्घाटन कार्यक्रम झाल्यावर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आपला जीव पणाला लावला त्यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कामाला व दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाचपेयी यांना विरोध होत असेल तर यांची बुद्धी तपासण्याची आवश्यकता वाटते, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी व महाविकास आघाडीवर टीका केली.

दरम्यान, आमदार लांडगेंनी झालेल्या प्रकाराबद्दल महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आणि म्हणाले की, पाच वर्षात घोषणा द्यायलाही विरोधकांकडे कोणी नव्हतं. असे ओरडणारे पैलवान मी खूप पाहिलेत. जे ओरडते ते चावत नाही, अशी एक म्हण आहे. त्यामुळे मी अशा ओरडणाऱ्या पैलवानांना घाबरत नाही. भाजपच्या नगरसेवकांनी लोकांच्या गरजेची, हिताची कामे केली आहेत. जोपर्यंत आपल्यासोबत शहरातील नागरिक आहेत तोपर्यंत अशांना घाबरायचं काम नाही. काम दाखव आणि मत माग, असं नागरिक म्हणणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT