Sandeep Khardekar Sarkarnama
पुणे

BJP Political News : संदीप खर्डेकरांवर सोपवली 'ही' मोठी जबाबदारी; पण ते चंद्रकांतदादांची पाठ सोडणार का...?

Sandeep Khardekar News : चंद्रकांत पाटलांची सावली म्हणून त्यांची ओळख आहे.

Deepak Kulkarni

Pune : ठाकरे सरकार घालवून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचा हात हातात घेतला. तर दुसरीकडे आगामी निवडणुकांसाठी महायुती सरकार भक्कम करण्याच्या उद्देशाने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनाही टाळी दिली. पण ही महायुती अजितदादांच्या बालेकिल्ला पुण्यापासून सर्वत्र मजबूत राहावी यासाठी भाजप नेते प्रयत्न करत आहेत. पुण्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षात मतभेद होऊ नयेत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळजी घेत आहेत.

याच धर्तीवर अशावेळी तीनही पक्षात समन्वय राखण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पुण्यातील जुनेजाणते नेते खर्डेकरांवर सोपवली. चंद्रकांत पाटलांच्या भोवतीच राहणाऱ्या खर्डेकरांना 'महायुती'चे समन्वय राखण्यासाठी सवड मिळणार आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

आगामी काळात महायुतीतील सर्व घटक पक्षांशी योग्य समन्वय राखण्यासाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांची पुणे शहर महायुतीच्या 'समन्वयक'पदी नियुक्ती करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते खर्डेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, पुणे शहर प्रभारी अमर साबळे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

संदीप खर्डेकर यांची भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख होती. पण मुंडे यांच्या अकाली निधनानंतर खर्डेकर यांनी पुण्याचे पालकमंत्री व कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंदकात पाटील(Chandrakant Patil) यांच्या गटात प्रवेश करत भाजपच्या प्रचार प्रसाराची धुरा सांभाळली. चंद्रकांतदादांची सावली म्हणून त्यांची ओळख आहे. शहरातील दादांचा कुठलाही कार्यक्रम, पत्रकार परिषदा यात संदीप खर्डेकर आवर्जून उपस्थित असतात.

पण आता त्यांची पुणे शहर महायुतीच्या 'समन्वयक'पदी निवड करण्यात आल्यानंतर ते चंद्रकांत पाटलांची पाठ सोडत स्वतंत्रपणे महायुतीतील भाजप(BJP), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समन्वयासाठी शहरभर दौरा करणार का, नेत्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला वाढवणार का अशा चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरु लागल्या आहेत.

निवड होताच खर्डेकरांचा मोठा दावा...

महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष,लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम संघटना, पतीत पावन संघटना यासह विविध समविचारी पक्ष,संघटना, स्वयंसेवी संस्था, यांच्याशी योग्य समन्वय साधून, सर्वांच्या सहकार्याने आगामी लोकसभा,विधानसभा व महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवू असा विश्वास संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT