Sharad Pawar VS Ajit Pawar: अजितदादांची नवी चाल; शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची केली मागणी

NCP Crisis : अजित पवार गटाची विधिमंडळ अध्यक्षांकडे शरद पवार गटातील आमदारांना निलंबित करण्याची मागणी
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यानंतर अजित पवारांच्या गटाकडून पक्ष आणि चिन्हावरही दावा सांगण्यात आला. त्यामुळे दोन्ही गटातील संघर्ष थेट निवडणूक आयोगापर्यंत गेला. असे असतानाच आता शरद पवार गटातील आमदारांविरोधात अजित पवार गट आक्रमक झाला आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदारांनी पक्ष विरोधी कृत्य केल्याने त्या आमदारांना अपात्र करण्यात यावं, यासंदर्भातील याचिका अजित पवार गटाकडून विधिमंडळात दाखल करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच आपणच मूळ राष्ट्रवादी असल्याचा दावाही अजित पवार गटाने केला आहे.

Sharad Pawar and Ajit Pawar
Rahul Narwekar Delhi Visit : सुप्रीम कोर्टाने कान उपटल्यानंतर धडकी भरलेल्या राहुल नार्वेकरांनी घेतली महाधिवक्ता तुषार मेहतांची भेट

पक्ष विरोधी कृत्य करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी मूळ राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटाने विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हं निर्माण झाले आहे.

दरम्यान, अजितदादांच्या गटाने ही नवी खेळी खेळल्याने आता राष्ट्रवादीतील दोन्ही गटात राजकारण तापण्याची शक्यता असून यावर शरद पवार गट काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Sharad Pawar and Ajit Pawar
Ajit Pawar News : अजितदादा दीड वर्षापूर्वीचे विधान खरे करणार : 'माळेगाव'चे अध्यक्ष तावरे वगळून इतर होणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com