Eknath Shinde - Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

Eknath Shinde Reply to Thackeray: देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नव्हे; तर मास्टर ब्लास्टर; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Jejuri News : फडणवीसांना मस्टर मंत्री म्हणताना ‘काय तरी वाटलं पाहिजे हेातं. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, त्याचा मी साक्षीदार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune : काही लोकांना राजकीय बोलल्याशिवाय दिवसच जात नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ते मस्टर मंत्री म्हणाले. पण, मस्टर मंत्री म्हणताना ‘काय तरी वाटलं पाहिजे हेातं. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांनी सांगितलेली प्रत्येक कामे फडणवीसांनी केली. त्याची तरी जाणीव ठेवायची होती. ते मस्टर मंत्री नाही, तर मास्टर ब्लास्टर देवेंद्र फडणवीस आहेत. ते कधी चौकार-षटकारही मारतात, तर कधी विकेटही घेतात, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. (Devendra Fadnavis is not a muster minister; So Master Blaster: Eknath Shinde )

जेजुरीत आज (ता. ७ ऑगस्ट) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव आणि आमदार उपस्थित होते.

शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मस्टर मंत्री राहिले आहेत, असे विधान केले होते. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी जेजुरीतील कार्यक्रमातून उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हालाही आयाराम म्हणतात. पण, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिले, त्यांना गयाराम म्हणायचे का? बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वानुसार आम्ही काम करत आहोत.

देवेंद्र फडणवीसांच्या काळातील योजना मधल्या सरकारने अंहकारापोटी बंद केल्या. पण, आम्ही त्या वर्षभरात सुरू केल्या. राज्यकर्त्यांकडे अहंकार नसावा. आम्ही दिल्लीला गेल्यावर आमची टिंगल केली जाते. पण, आम्ही राज्याच्या विकासासाठीच केंद्राकडे जातो. तुम्ही कितीही टीका केली तरी आम्ही राज्याच्या विकासासाठी केंद्राकडे यापुढेही जाणारच. आम्हाला कोणती नोटीस आली; म्हणून आम्ही तिकडे गयावया करण्यासाठी गेलो नाही, तर विकासासाठीच आम्ही दिल्लीला जातो, असेही शिंदे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT