Bagal Group With BJP: रश्मी बागल पुण्यात अमित शहांच्या व्यासपीठावर; बागल गट भाजपच्या वाटेवर

Rashmi Bagal News: गेल्या वर्षी दिग्विजय बागल यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याची चर्चा रंगली होती.
Rashmi Bagal
Rashmi BagalSarkarnama
Published on
Updated on

Karmala Political News: करमाळ्यातील बागल कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या जवळ गेल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक भाजप नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या आहेत. पुण्यात रविवारी झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या कार्यक्रमालाही बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी हजेरी लावली. सध्या त्या शिवसेनेत असल्या तरी कोणती शिवसेना याबाबत त्या बोलतच नाहीत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासूनच्या गाठीभेटी पाहता बागल गट भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. बागल बहिण-भाऊ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्याता वर्तविण्यात येत आहे. (Bagal group in Karmala on the path of Bharatiya Janata Party)

करमाळा (Karmala) विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपासून बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल आणि मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हे बहीण-भाऊ सर्वच पक्षांशी बोलणी करत आहेत. मात्र ते कोणत्या गटात आहेत, यावर ते बोलायला तयार नाहीत. मात्र, सध्याच्या हालचाली पाहता बागल गट सध्या भाजपच्या संपर्कात असल्याचे दिसून येते.

Rashmi Bagal
Solapur Politic's : भाजप आमदाराच्या मतदारसंघातील अनेक सरपंच BRSच्या मार्गावर; ४० गाड्यांचा ताफा हैदराबादकडे रवाना

पंधरा दिवसांपूर्वी भाजपचे (BJP) केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि रश्मी बागल यांच्या भेटीचा फोटो व्हायरल झाला होता. तत्पूर्वी गेल्या वर्षी दिग्विजय बागल यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. पिंपरी चिंचवड येथे रविवारी (ता. ६) झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या कार्यक्रमातही रश्मी बागल दिसत आहेत. त्यामुळे बागलांचा पुढचा पक्ष भाजप असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

माजी राज्यमंत्री (कै.) दिगंबरराव बागल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनासाठी बागलांनी बहुतांश भाजप नेत्यांना आमंत्रित केले होते. तेव्हापासून बागल गट भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा रंगली आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत रश्मी बागल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांच्या पराभव झाला, तेव्हापासून त्या शिवसेनेत असूनही ठराविक अंतर पाळून आहेत.

Rashmi Bagal
Pune Political News: शरद पवार गटातील आमदाराने घेतली अजितदादांची भेट...

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपच्या सहकार्यातून सरकार स्थापन केले आहे. मात्र बागल नेमके कोणत्या शिवसेनेबरोबर आहेत, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. नुकत्याच झालेल्या मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाने विजय मिळवल. मात्र, गेल्या वर्षी गाळप केलेल्या उसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. आयडीबीआय बँकेकडून त्यांनी जवळपास कर्ज मंजूर करूनही घेतले होते. मात्र, कारखान्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असल्याचे विरोधकांनी बॅंकेला कळविले आणि बँक प्रकरण बारगळले.

Rashmi Bagal
Shirdi Lok Sabha : ठाकरे गटाचा शिर्डी लोकसभेसाठी उमेदवार ठरला; बडा मासा गळाला, काँग्रेसचेही बळ मिळणार

आता मकाई कारखाना सुरू होण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची देणी देणे गरजेचे बनले आहे. पडझड झालेल्या बागल गटाला उभारी देण्यासाठी कारखाना सुरळीत चालवणे गरजेचे आहे, त्यासाठी भाजपची मदत होते का? याची चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांची देणे देण्यासाठी बँकेचे कर्ज मिळावे, यासाठी रश्मी बागल व दिग्विजय बागल हे बहिण-भाऊ प्रयत्न करत आहेत, त्यासाठी त्यांनी दिल्लीवारी केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा प्रवास झालेल्या बागल गटाचा पुढचा पक्ष भाजप असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com