Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis on Sharad Pawar : ''जागा वाटपात काही ओढाताण झालीच, तर आम्ही पवारांचा सल्ला घेऊ'' ; फडणवीसांनी लगावला टोला!

Devendra Fadnavis on Raj Thackeray and Uddhav Thackeray : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांबाबतही मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे?

Sudesh Mitkar

Devendra Fadanavis Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी साधलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये एकीकडे महाविकास आघाडी म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढाव्यात अशी आपली इच्छा असल्याचे सांगितलं. तर दुसरीकडे या निवडणुकांमध्ये महायुतीचं जागावाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याला उत्तर दिलं आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या ठिकाणावरून प्रस्ताव येत आहेत. जसे जसे प्रस्ताव येत आहेत तसतशी नुकसान भरपाई सरकारकडून शेतकऱ्यांना केली जात आहे. ही कायम सुरू असणारी प्रक्रिया असून ही प्रक्रिया कधीही थांबत नसते असं फडणवीस म्हणाले.

तर पुणे महापालिकेतील महिला अधिकारी अधिकाऱ्यासोबत भाजप पदाधिकाऱ्याने गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठलाही पक्षाचा असो जर त्याने चुकीचं केलं अथवा कायदा मोडला तर त्याला आम्ही सोडणार नाही. त्यामुळे जी काही कारवाई करायची आहे ती होणारच असल्याचं देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केलं.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील जागा वाटप हे जिकरीचे होऊ शकतं अशी शक्यता शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केली होती. त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जर जागा वाटपामध्ये आमची काही ओढाताण झाली तर आम्ही शरद पवारांचा सल्ला घेऊ, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊत काय बोलतात यावर मला प्रश्न विचारात जाऊ नका. जर माझ्या लेव्हलचा असेल ज्याला राजकारण समजतं, ज्याला खरं बोलता येतं असा कोणी व्यक्ती असेल तर मला प्रश्न विचारात जा नाहीतर तुमचाही वेळ वाया जातो आणि माझाही. अशी टीका फडणवीस यांनी केली.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, मला बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना व्हायचं नाहीये. ते दोन पक्ष आहेत, ते दोघे भाऊ भाऊ आहेत, काका पुतणे आहेत. त्यांनी त्यांचं ठरवायचं आहे. जर ते एकत्र आले तर मी प्रतिक्रिया देईल. मात्र आता तरी मला त्याबाबत विचारू नका, असं म्हणत या प्रकरणांमध्ये जास्त बोलून हात दाखवून अवलक्षण मला आणायचं नाही असं फडणवीस म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT