devendra fadnavis sarkarnama
पुणे

Political Horoscope: केंद्रात फडणवीसांचे महत्त्व वाढणार; PM पदाच्या स्पर्धेत अग्रक्रमाने नाव येण्याची शक्यता

Devendra Fadnavis Prime Minister Race: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७०चा असून, त्यांची कुंभ रास आहे. या राशीला साडेसाती असून, साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे. मागील पाच वर्षे साडेसाती सुरू आहे.

सरकारनामा ब्यूरो

✅ Summary

  1. ज्योतिषीय अंदाजानुसार देवेंद्र फडणवीस यांना जून 2027 पर्यंत साडेसातीमुळे अडथळ्यांचा सामना करावा लागेल.

  2. सप्टेंबर महिन्यातील चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणामुळे महाराष्ट्रात राजकीय गोंधळ, फेरबदल आणि अशांतता होण्याची शक्यता आहे.

  3. आगामी काळात फडणवीस यांचे केंद्रात महत्त्व वाढून ते पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत अग्रक्रमाने येऊ शकतात, असे भाकीत ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जून २०२७ पर्यंत साडेसाती असून तोपर्यंत त्यांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे, मात्र, जून २०२७नंतर फडणलीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असून, केंद्रातील राजकारणामध्ये फडणवीस यांचे महत्त्व वाढू शकते. आगामी काळात पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत फडणवीस यांचे अग्रक्रमाने येण्याची शक्यता वाटते, असे पुण्यातील ज्योतिष सिद्धेश्वर मारटकर यांना 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. या आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७०चा असून, त्यांची कुंभ रास आहे. या राशीला साडेसाती असून, साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे. मागील पाच वर्षे साडेसाती सुरू असून, याच काळामध्ये फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. २०१४ ते २०१९च्या तुलनेत २०२४नंतर त्यांना मिळालेले मुख्यमंत्रिपद त्यांच्यासाठी कटकटीचे ठरले आहे. पक्षाला आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असूनही, महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे, असे मारटकर म्हणाले.

सध्या साडेसातीशिवाय मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण कुंभ राशीच्या अष्टमातून सुरू असल्यामुळे मराठा आंदोलनाला सामोरे जाताना मोठी हतबलता दिसून येत आहे. मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण १३ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरपर्यंत काळ मुख्यमंत्र्यांसाठी कटकटीचा ठरणार आहे. पण त्याचबरोबर सात सप्टेंबरचे चंद्रग्रहण आणि २१ सप्टेंबरचे सूर्यग्रहण मुख्यमंत्री व महाराष्ट्रासाठी प्रतिकूल राहू शकते.

महाराष्ट्राची धनू रास असून, कन्या राशीचा मंगळ दशमात भ्रमण करीत असल्याने महाराष्ट्र व विशेषतः मुंबईमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. या प्रतिकूल ग्रहणाचा परिणाम महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर होण्याची शक्यता आहे. सात ते २१ सप्टेंबर या काळात मोठ्या घटना महाराष्ट्रामध्ये अनुभवास येतील. याची तीव्रता १५ ऑक्टोबरपर्यंत राहू शकते. या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सात सप्टेंबरच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृषभ लग्न उदित असून, दशम स्थानात कुंभ राशीत पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात पौर्णिमा होत आहे. दशमात चंद्र राहू, चतुर्थात रवी-केतू बुध, लग्नी हर्षल, धनस्थानी गुरू, तृतीयात शुक्र, पंचमात मंगळ व लाभस्थानी शनी नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता राहूयुक्त पौर्णिमा दशमात होत असून, लाभातील शनी-नेपच्यून योगामुळे राजकीय क्षेत्रात मोठे गोंधळ व नाट्यमय घटना होण्याची शक्यता वाटते.

FAQs

Q1. देवेंद्र फडणवीस यांची साडेसाती कधी संपेल?
A1. त्यांची साडेसाती जून 2027 पर्यंत सुरू राहणार आहे.

Q2. सप्टेंबर 2025 मधील कोणती खगोलीय घटना महाराष्ट्रासाठी प्रतिकूल ठरू शकते?
A2. 7 सप्टेंबरचे चंद्रग्रहण आणि 21 सप्टेंबरचे सूर्यग्रहण प्रतिकूल ठरू शकते.

Q3. ज्योतिषानुसार महाराष्ट्रात काय बदल घडू शकतात?
A3. मंत्रिमंडळ फेरबदल, नेतृत्वबदल आणि मोठ्या राजकीय घटना संभवतात.

Q4. जून 2027 नंतर फडणवीस यांना कोणती संधी मिळू शकते?
A4. त्यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT