Ayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट: बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक

Andekar-Komkar Gang War : आंदेकर आणि कोमकर गँगमध्ये झालेल्या गँगवॉरमधून गोविंद ऊर्फ आयुष गणेश कोमकर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.
Ayush Komkar Case
Ganesh Komkar present on funeral of his son Ayush KomkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खुनाचा बदला घेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मध्यरात्री आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह सहा जणांना अटक केली आहे.

आरोपी हे बुलढाणा येथे पळून जात असताना त्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू यांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

आयुष कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. शुक्रवारी (५ सप्टेंबर) आंदेकर टोळीतील अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुष क्लासवरून पार्किंगमध्ये आल्यानंतर गोळ्या झाडल्या. यात आयुषचा मृत्यू झाला.

या घटनेने पुणे पुन्हा हादरलं आहे. पुन्हा टोळी युद्ध सुरु झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता.

Ayush Komkar Case
Vijaykumar Gavit: भाजपच्या माजी मंत्र्यांची शिवसेना-काँग्रेसच्या नेत्यांवर आगपाखड; कुठल्याही पुढाऱ्याने एकही योजना दिली नाही....

आयुष कोमकर हत्येनंतर पुणे पोलिसांनी आपली तपासाची सुत्रे वेगाने फिरवत तीन दिवसात यातील आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत बंडू आंदेकर याच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश पाटील आणि अमित पाटोळे हे प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असलेल्याचा आरोप आहे.

गणेश कोमकरचा मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो क्लासवरून दुचाकीवरून आला त्यावेळी पार्किंगमध्ये त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Ayush Komkar Case
PMC Election 2025: पुण्यात अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चा भाजपशी संघर्ष

वनराज आंदेकर हत्या प्रकऱणी 16 आरोपींना अटक कऱण्यात आली होती. सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर अशी आरोपींची नावे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com